Pune Mefedrone Bust: वाघोलीत मेफेड्रोन तस्करी; दोघांना पोलिसांची अटक, 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर रस्त्यावरील पोलिस कारवाईत मेफेड्रोन विक्री करणाऱ्या दोघांकडून एकूण 55 लाखांचा मुद्देमाल जप्त; तस्कर मूळ राजस्थानचे असल्याचे तपासात समोर आले
Mefedrone
Mefedrone Pudhari
Published on
Updated on

पुणे: अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 28 लाखांचे मेफेड्रोन, मोटार, मोबाईल असा 55 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेले आरोपी मागील वर्षभरापासून शहरात मेफेड्रोनची तस्करी करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Mefedrone
Pune Wife Credit Card Relief: क्रेडिट कार्ड थकबाकीवर पत्नीला दिलासा, पतीला लष्कर न्यायालयाचा आदेश

किशन नंदकिशोर लधड (वय 35, रा. धानोरी), हनुमान रूपाराम चौधरी (वय 33, रा. वडगाव मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील केसनंद भागात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या किशन लधड याला वाघोली पोलिसांनी अटक केली होती.

Mefedrone
Shivajinagar Women Lawyer Fight: न्यायालयात महिला वकिलांमध्ये हाणामारी, डोक्यावर जखम

तपासात वडगाव मावळमधील तस्कर हनुमान चौधरी याने त्याला मेफेड्रोन पुरविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चौधरीला वडगाव मावळ परिसरात सापळा लावून पकडले. हे दोघे मूळचे राजस्थान येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mefedrone
Khamundi Injured Leopardess Rescue: उपासमारीमुळे जखमी बिबट मादी रेस्क्यू

चौधरी याच्या मोटारीत मेफेड्रोन सापडले. त्याच्याकडून 28 लाख रुपयांचे 134 ग््रॉम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. चौधरी मूळचा राजस्थानमधील आहे. त्याने राजस्थानातून मेफेड्रोन आणून शहरात विक्री केल्याची मााहिती तपासात मिळाली.

Mefedrone
Yerwada Vehicle Vandalism Arrest: लक्ष्मीनगरमधील वाहन तोडफोड करणाऱ्या गुंडावर पोलिसांचा धिंड

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक पल्लवी मेहेर, सहायक निरीक्षक विजय चंदन, उपनिरीक्षक अमोल काळे, प्रदीप मोरे, शेखर शिंदे, विशाल गायकवाड, मारुती वाघमारे यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news