Pune Airport Domestic Passengers 2025: पुणे विमानतळावर 2025 मध्ये देशांतर्गत प्रवाशांची संख्या 1 कोटी 5 लाखांवर पोहोचली

नवीन टर्मिनल, पर्यटन आणि व्यावसायिक प्रवाहामुळे प्रवाशांची संख्या वाढली; पुणे विमानतळाने 4.93% वार्षिक वाढ नोंदवली
Flight
FlightPudhari
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे: सन 2024 मध्ये पुणे विमानतळावरून देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या 1 कोटी 31 हजार 52 इतकी होती. मात्र, 2025 मध्ये हा आकडा वाढून 1 कोटी 5 लाख 25 हजार 869 वर पोहोचला आहे. म्हणजेच एका वर्षात देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 4 लाख 94 हजार 817 (जवळपास 5 लाख) इतकी वाढ झाली आहे. टक्केवारीचा विचार करता पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्याची संख्या वार्षिक 4.93 टक्के इतकी वाढली असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

Flight
Pune Mefedrone Bust: वाघोलीत मेफेड्रोन तस्करी; दोघांना पोलिसांची अटक, 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे विमानतळ प्रशासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीतून हे समोर आले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाने 2025 या वर्षात प्रवासी संख्येचा एक मोठा टप्पा पार केला असून, एकूण प्रवाशांच्या संख्येत तब्बल 5 लाखांची लक्षणीय वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत पुणे विमानतळावरील वर्दळ वाढली असून, विमानतळाने एकूण प्रवासी वाहतुकीच्या वार्षिक संख्येचा आकडा एक कोटीच्या पार नेला आहे.

Flight
Pune Wife Credit Card Relief: क्रेडिट कार्ड थकबाकीवर पत्नीला दिलासा, पतीला लष्कर न्यायालयाचा आदेश

विद्येचे माहेरघर आणि राज्याची आयटी राजधानी असलेल्या पुणे शहराच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. 2025 या वर्षात एकूण देशांतर्गत प्रवासी संख्या 1 कोटी 5 लाखांच्या पुढे गेली आहे. नवीन टर्मिनलमुळे मिळालेल्या अद्ययावत सुविधा आणि पुण्याचा चहुबाजूंनी होणारा विस्तार हे या ऐतिहासिक वाढीचे मुख्य आधारस्तंभ ठरत असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

नवीन टर्मिनलचा गेमचेंजर प्रभाव

पुणे विमानतळावर सुरू झालेल्या नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. प्रशस्त चेक-इन काउंटर्स, अद्ययावत बॅगेज हँडलिंग सिस्टिम आणि सुरळीत सुरक्षा तपासणीमुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून पुणे विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमताही वाढली आहे. यामुळे विमान कंपन्यांनी पुण्यातून नवीन फेऱ्या सुरू करण्यास पसंती दिली आहे.

Flight
Shivajinagar Women Lawyer Fight: न्यायालयात महिला वकिलांमध्ये हाणामारी, डोक्यावर जखम

पर्यटन आणि तीर्थयात्रेचा ओघ

पुणे हे लोणावळा, महाबळेश्वर यांसारख्या पर्यटन स्थळांचे प्रवेशद्वार आहे. तसेच अष्टविनायक दर्शन आणि शिर्डीसाठी येणारे पर्यटक पुण्याचाच मार्ग निवडतात. 2025 मध्ये पर्यटन क्षेत्रातील तेजीमुळे देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम विमानतळाच्या आकडेवारीवर दिसून आला आहे.

औद्योगिक आणि आयटी क्षेत्राचा विस्तार

पुण्यातील हिंजवडी, मगरपट्टा आणि चाकण-तळेगाव या औद्योगिक पट्‌‍ट्यांचा विस्तार वेगाने होत आहे. नवीन स्टार्ट-अप्स आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे व्यावसायिक कामासाठी होणाऱ्या प्रवासात मोठी वाढ झाली आहे. पुण्याचे वाढते नागरीकरण आणि उपनगरांचा विस्तार यामुळे विमान प्रवासाची मागणी वाढली आहे.

Flight
Khamundi Injured Leopardess Rescue: उपासमारीमुळे जखमी बिबट मादी रेस्क्यू

पुणे विमानतळाने देशांतर्ग प्रवासी वाहतूक संख्येत 1 कोटी 5 लाखांचा टप्पा ओलांडणे, हा आमच्यासाठी एक मैलाचा दगड आहे. नवीन टर्मिनल कार्यान्वित झाल्यामुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा मिळत आहेत, याचा सकारात्मक परिणाम प्रवासी संख्येत झाला आहे. पुणे हे फक्त आयटी आणि ऑटोमोबाईल हब नसून, पर्यटनाचेही मोठे केंद्र आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता, आम्ही येणाऱ्या काळात अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यावर भर देत आहोत. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news