खडसे यांच्यावर दबावतंत्राचा वापर; आमदार रोहित पवार

Rohit Pawar
Rohit Pawar
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामती मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांचे प्रचारप्रमुख प्रवीण माने हे अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. त्यांचा इंदापुरामध्ये मोठा व्यवसाय असल्याने ते सहभागी झाले असतील. मात्र, इंदापूरमधून गेल्या निवडणुकीच्या तुलनेने 15 ते 20 हजारांनी मताधिक्य, तर बारामती मतदारंसघात 3 लाखांच्या मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येतील, असा दावा आ. रोहित पवार यांनी केला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, माझ्या शिक्षणाबाबत ज्यांनी कोणी वक्तव्य केली त्यांनी प्रथमतः माहिती घ्यावी. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने मी भारतातच शिकलेलो आहे. मी पदवीधर असून, अनुभवातून इथपर्यंत आलेलो आहे. कदाचित प्रदीप गारटकर यांची अद्याप झोप पूर्ण झालेली नसल्याने आपण कोणाबद्दल, कुठे बोलता आणि काय बोलतो याचे भान राहत नसावे. त्यामुळे त्यांच्याबाबत अधिक बोलणे चुकीचे ठरेल.

खेकड्याबाबत नोटीस नाही…

एका पत्रकार परिषदेत विरोधकांना उपरोधिकपणे टोला लगावण्यासाठी रोहित पवार यांनी खेकडा आणला होता. त्यावरून प्राणिप्रेमी संघटनेने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यावर खेकडा मिळाल्यास आणि तो बोलला, तर नक्कीच पुढची भूमिका स्पष्ट करेन, असा उपरोधिक टोलाही रोहित पवार यांनी या वेळी लगावला.

…म्हणून भाजपत प्रवेश करत असतील

एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर भाजपच्या वतीने दबावतंत्राचा वापर केला गेला असावा. अरविंद केजरीवाल यांना अटक करून जेलमध्ये टाकले, तशीच अवस्था या वयामध्ये खडसे यांची होऊ नये म्हणून ते भाजपमध्ये प्रवेश करीत असतील, असे पवार म्हणाले.

फडणवीसांचे अधिकार तावडेंकडे

गेल्या काही वर्षांमधील देवेंद्र फडणवीस यांच्या करामतींमुळे अलीकडे त्यांचे पक्षातील महत्त्व कमी होत चालले आहे. ज्या विनोद तावडेंचे तिकीट फडणवीस यांनी कापले त्यांनाच पक्षाने एकनाथ खडसे यांच्याकडे पाठवले. एकंदरच त्यांचे पक्षातील महत्त्व कमी होत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news