पिंपरी : राज्यातील काही भागात कोरोनाच्या जेएन 1 या नव्या विषाणूने ग्रस्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरवा असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक केले होते. कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात येत होती. काही कालावधीनंतर कोरोना कमी झाल्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे बंद केले होते; मात्र आता पुन्हा राज्यात काही ठिकाणी कोरोनाचा जेएन-1 व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
त्यामुळे तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरणे गरजेचे आहे; मात्र शहरात अद्याप कोरोना जेएन-1 व्हेरिएंट विषाणू आढळला नाही. मात्र तरीदेखील गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे आहे. शहरातील मुख्य गर्दीच्या ठिकाणी त्यामध्ये मेट्रो, रेल्वेस्थानक , बाजार, बसस्थानक, अशा गर्दीच्या नागरिक विनामास्क फिरताना आढळून
येत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात जेएन-1 कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे . तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रुग्णाला सर्दी किंवा खोकला झाल्यास मास्कचा वापर करावा. त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येतो. तसेच वारंवार तोंडाला किंवा डोळ्यांना स्पर्श करू नये. तसेच योग्य पध्दतीने आहार घेणे गरजेचे आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय
पिंपरी चिंचवड शहरात जेएन-1 व्हेरिएंट एकही विषाणू रुग्ण आढळला नाही. तसेच कोरोनाचे 3 पॉझिटिव्ह रुग्ण असून मागील महिन्यात 30 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
– डॉ लक्ष्मण गोफणे आरोग्य वैद्यकीय अधिकारी
हेही वाचा