Suruchi Adarkar : सुरुची अडारकरचे पुनरागमन या मालिकेतून होणार | पुढारी

Suruchi Adarkar : सुरुची अडारकरचे पुनरागमन या मालिकेतून होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘का रे दुरावा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुरुची अडारकरचे पुन्हा झी मराठीवर पुनरागमन होत आहे. सुरुचीने साकारलेली अदिती खानोलकर ही भूमिका त्यावेळी खूप गाजली होती. आता सुरुची झी मराठीवरील मालिकेतून पुन्हा (Suruchi Adarkar ) पुनरागमन करत आहे. या मालिकेचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. यामध्ये तिची भूमिका ग्लॅमरस असणार आहे. (Suruchi Adarkar)

सुरुची अडारकरने डिसेंबरमध्ये बांधली होती लग्नगाठ

सुरुची अडारकरने ६ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली होती. तिने अभिनेता पियुष रानडेसोबत विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. काही व्हिडिओदेखील पाहायला मिळताहेत.

सुरुची-पियुषने लग्नातील अनेक आनंदाचे क्षण व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात. मेहंदी, हळद, सप्तपदी, आणि उखाणा असा तिचा लग्नाचा प्रवास फोटो आणि व्हिडिओंमधून पाहायला मिळतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Seven Vow Stories (@sevenvowstories)

Back to top button