Pune Police Accident Death: पोलीस ठाण्यातून बाहेर पडले, रस्ता ओलांडताना वाहनाची धडक; पुण्यात सहाय्यक फौजदाराचा मृत्यू

Uruli Kanchan Police Accident: पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडताना अपघात; धडक देणारा अज्ञात वाहनचालक वाहनासह पसार, शोध सुरू
Pune Police Accident
Pune Police AccidentPudhari
Published on
Updated on

Pune Police Accident Death

उरुळी कांचन: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि. १८) रात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Pune Police Accident
TET Rules Review: टीईटी नियमांची केंद्राकडून व्यापक समीक्षा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या पात्रतेवरही विचार

सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे (वय ४९ मूळ -सिंदखेडा,धुळे ) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिस ठाण्यातून बाहेर पडताना रस्ता ओलंडत असताना श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर, ग्रीन पार्क हॉटेलजवळ हा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश दाभाडे हे पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दाभाडे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Pune Police Accident
Maha Paanand Grid: शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना मिळणार ‘महापाणंद ग्रीड’चे बळ; ४ लाख रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग

दरम्यान, सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे हे मूळचे सिंदखेड, धुळे येथील रहिवासी असून ते २००१ साली पोलिस दलात भरती झाले असून ते २००१ पासून पुणे ग्रामीण पोलिस कार्यरत आहे. पौंड, वेल्हे, जेजुरी , सासवड पोलिस ठाण्यात सेवा बजावून ते उरुळीकांचन पोलिस सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते.

Pune Police Accident
Pune Ganeshotsav Crowd: पुण्यात गणेशोत्सवाची भक्तीमय गर्दी; पाच दिवसांत १५ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

त्यांच्या निधनाची बातमी समजताच उरुळीकांचन पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांना शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येत असून शासकीय इतमातात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Pune Police Accident
Ayushman Bharat School Health Training: आयुष्मान भारत शालेय आरोग्य कार्यक्रमासाठी ४० हजार शिक्षकांचे ऑनलाइन प्रशिक्षण

दरम्यान अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पळ काढला. त्यामुळे बेफाम वाहन चालविणाऱ्या वाहनचालकाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news