Pune Ganeshotsav Crowd: पुण्यात गणेशोत्सवाची भक्तीमय गर्दी; पाच दिवसांत १५ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

भाविकांची संख्या मोजण्यासाठी पोलिसांचा एआय कॅमेऱ्यांचा वापर; गर्दी नियंत्रणासाठी वॉचटॉवर, सीसीटीव्ही अन् कडेकोट बंदोबस्त
Ganeshotsav Crowd
Ganeshotsav CrowdPudhari
Published on
Updated on

पुणे: वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे समोर आले आहे. दि. १४ सप्टेंबरपासून आत्तापर्यंत मध्यवर्ती पुण्यातील विविध गणेश मंडळांमधील गणरायाचे १५ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. मंडळांनी साकारलेल्या आकर्षक देखाव्यांनाही भाविकांची मोठी पसंती मिळत आहे. भाविकांची संख्या मोजण्यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. बेलबागसह शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये हे कॅमेरे बसविण्यात आले असून, त्याद्वारे गर्दीतून जाणाऱ्या भाविकांची संख्या मोजली जात आहे.

Ganeshotsav Crowd
Ayushman Bharat School Health Training: आयुष्मान भारत शालेय आरोग्य कार्यक्रमासाठी ४० हजार शिक्षकांचे ऑनलाइन प्रशिक्षण

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

दरम्यान, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी वॉचटॉवर उभारण्यात आले असून, त्यावरून पोलिसांकडून परिसरावर निगराणी ठेवली जात आहे. तसेच, मुख्य नियंत्रण कक्षातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण उत्सवावर लक्ष ठेवण्यात येत आहे. गणेशोत्सवाला सुरुवात होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत.

Ganeshotsav Crowd
Pune PG Hostel Fire Safety: लोहगाव-निंबाळकरनगरातील ११ पीजी, हॉस्टेलला महापालिकेने ठोकले सील!

शहराच्या मध्यवर्ती भागातील मानाचे आणि प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक पुण्यात येत आहेत. मंडळांनी उभारलेल्या आकर्षक देखाव्यांना भाविकांची विशेष पसंती मिळत आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मंडई, दगडूशेठ परिसर, शनिवारवाडा, बुधवार पेठ यांसह मध्यवर्ती भागात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Ganeshotsav Crowd
Pune University Mess Fees Hike: पुणे विद्यापीठातील भोजनगृहांच्या दरात १० रुपयांपर्यंत वाढ; विद्यार्थ्यांमध्ये संताप

एआय कॅमेऱ्यांद्वारे गर्दीची मोजणी

भाविकांची नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी पुणे पोलिसांनी बेलबाग, बुधवार पेठ, शगुण चौक, अप्पा बळवंत चौक, टिळक रस्ता आदी ठिकाणी एआयआधारित कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीतून जाणाऱ्या व्यक्तींची संख्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोजली जाते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने केवळ अंदाज घेण्याऐवजी प्रत्यक्ष गर्दीचा आढावा घेणे पोलिसांना शक्य होत आहे. दि. १४ सप्टेंबरपासून मध्यवर्ती भागात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषतः प्रमुख गणेश मंडळांच्या परिसरात सकाळपासून रात्रीपर्यंत भाविकांची गर्दी होत आहे. एआय कॅमेऱ्यांद्वारे मिळणाऱ्या आकडेवारीच्या आधारे कोणत्या ठिकाणी गर्दी अधिक आहे, याचा अंदाज घेऊन पोलिसांकडून बंदोबस्त आणि वाहतूकव्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात येत आहेत.

Ganeshotsav Crowd
Bhandarkar Institute Pune: देशभरातील पुरातन हस्तलिखितांसह पोथ्यांचे डिजिटायझेशन पुण्यात

पुढील दिवसांत गर्दी वाढण्याची शक्यता

गणेशोत्सवाच्या पुढील दिवसांतही मध्यवर्ती पुण्यात भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यासह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे. एआय आधारित हेडकाउंट प्रणालीमुळे गणेशोत्सवातील गर्दीचे प्रमाण अधिक अचूकपणे नोंदविण्यास मदत होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news