

उरुळी कांचन: ‘तू मला खूप आवडतोस’ असे म्हणत एका 16 वर्षीय अल्पवयीन बालकाचा जबरदस्तीने मुका घेऊन व अश्लील चाळे केल्याचा प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) येथे नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी अष्टापूर (ता. हवेली) येथील ग््रााफिक डिझायनरवर उरुळी कांचन पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नागराज कोतवाल (रा. अष्टापूर ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 16 वर्षाच्या मुलाने उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कस्तुरी लॉन्ससमोर असलेल्या नागराज ग््रााफिक्स येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा शुक्रवारी कस्तुरी लॉन्ससमोर असलेल्या आरोपी कोतवाल याच्या ‘नागराज ग््रााफिक्स’ येथे कामानिमित्त गेला होता. काम संपल्यानंतर आरोपी नागराज कोतवाल याने पीडिताला घरी फोन करून सांग की काम जास्त आहे, उशीर होईल असे म्हणत हॉटेलवर थांबण्याचे आमिष दाखवले.
त्यानंतर, आरोपीने आपल्या गाडीतून पीडिताला पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव (ता. दौंड) येथे नेले. तेथे रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून, ‘तू मला खूप आवडतोस’ असे म्हणत पीडिताचा जबरदस्तीने मुका घेतला आणि अश्लील चाळे केले. तसेच लॉजवर चालण्याबाबत विचारणा करून पीडितावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आरोपी कोतवाल याने पीडित मुलाला रात्री पाऊणेतीन वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथे त्याच्या नागराज ग््रााफिक्स ऑफीसवर घेऊन आला.
या वेळी त्याच्या ऑफीसवर कामाला असलेल्या एका मुलासोबत फिर्यादी मुलगा घरी निघून गेला. घाबरलेल्या मुलाने घरी गेल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. 18) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास नागराज याने पुन्हा फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या अवस्थेत पीडिताने आपल्या आईसह उरुळी कांचन पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.