

पुणे: राज्यात सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्याच्या बहुतांश भागात दुपारनंतर वादळी पाऊस होत आहे. पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांत बुधवारी गारपीट झाली. दक्षिण कोकण, जळगाव, नाशिक, नगर, बीड, लातूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यांलगत पावसाची नोंद झाली.
पुढील तीन दिवस राज्यात अवकाळीचा प्रभाव राहणार आहे. दरम्यान, बुधवारी वर्ध्यात सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. दक्षिण कोकण, जळगाव, नाशिक, नगर, बीड, लातूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यांतही पावसाची नोंद झाली.
राज्यात 25 एप्रिलपर्यंत अवकाळीचा प्रभाव राहणार आहे. यात विदर्भात याची तीवता कमी असली, तरी तळकोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात 25 एप्रिलपर्यंत पाऊस कायम राहील. दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा मारा होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. कोकणात विशेषत: मुंबई, ठाणे रायगडमध्ये उष्ण व दमट हवामान पुढील दोन दिवस राहील.