पुणे; पुढारी वृत्तसेवा : राजकीय हित साधण्यासाठी काहींनी अनधिकृत संघटना स्थापन केली असून त्यामार्फत महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा अनधिकृत असून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद हीच अधिकृत संघटना असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेला माजी खासदार अशोक मोहोळ, अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार, रुस्तम ए हिंद अमोल बुचडे, हिंद केसरी अमोल बराटे, महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाड आणि ललित लांडगे उपस्थित होते.