Pune News : डीईएसचे विद्यापीठ अखेर सुरू; डॉ. शरद कुंटे यांची माहिती

Pune News : डीईएसचे विद्यापीठ अखेर सुरू; डॉ. शरद कुंटे यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे डीईएस पुणे विद्यापीठ हे खासगी विद्यापीठ चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू झाल्याची माहिती डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पुण्यातील इतर खासगी विद्यापीठांच्या तुलनेत डीईएस पुणे विद्यापीठाचे शुल्क कमी राहणार आल्याचे डॉ. कुंटे यांनी जाहीर केले. डीईएसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कुंटे बोलत होते.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, सोसायटीचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी, सदस्य प्रसन्न देशपांडे, प्रा. आशिष पुराणिक आदी उपस्थित होते. फर्ग्युसन कॉलेज आणि बीएमसीसी कॉलेजमधील सध्याचे अनुदानित अभ्यासक्रम हे त्या कॉलेजमध्ये सुरूच राहणार असल्याचेही डॉ. कुंटे यांनी स्पष्ट केले.

डॉ. कुंटे म्हणाले की, सध्या मुकुंददास लोहिया शैक्षणिक संकुलात हे विद्यापीठ कार्यान्वित झाले आहे. सध्या या विद्यापीठाच्या माध्यमातून प्रामुख्याने विनाअनुदानित तत्त्वावरील अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे. आगामी काळात तीन संशोधन केंद्र उभारण्यासाठी साधारण 1 लाख स्क्वेअर फुटाचे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी शैक्षणिक संकुलात साधारण 10 एकर जागा उपलब्ध आहे.

या विद्यापीठात स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ ह्युमॅनीटिज अँड सोशल सायन्स, स्कूल ऑफ डिझाईन अँड आर्टस्, स्कूल ऑफ सायन्स अँड मॅथेमॅटिक्स आणि स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट अशा पाच शाळांची निर्मिती केली आहे. या अंतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही विविध कारणांनी प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना कमी शुल्कात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे डॉ. कुंटे यांनी सांगितले.

बी – टेक कॉम्प्युटर सायन्स प्रवेश प्रक्रिया सुरू

यंदा शैक्षणिक वर्षात बी – टेक कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षासाठी प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश न मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांना केवळ शुल्क भरून प्रवेश मिळणार आहे. त्याचप्रमाणे डीईएसच्या शैक्षणिक संकुलात शिकण्याची संधी मिळणार आहे, असे डॉ. प्रसाद खांडेकर यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news