

पुणे : लग्नात नवदाम्पत्याला भेटवस्तू म्हणून कुणी पुष्पगुच्छ देते, तर कुणी आहेराचे पाकीट, तर एखादी छानशी वस्तू ! मात्र, पुण्यातील आरटीओ इन्स्पेक्टरला त्यांच्या लग्नात इतर सहकार्यांनी चक्क हेल्मेट भेट देत आश्चर्याचा धक्काच दिला. या वेळी लग्नाच्या मंडपात हेल्मेट भेट हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला. प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्याकडून सध्या रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबवत जनजागृती करण्यात येत आहे. रस्ते अपघात रोखून, हेल्मेटचे महत्त्व उलगडून सांगणे आणि ब्लॅक स्पॉट संदर्भात उपाययोजना करणे, हा या मागचा हेतू आहे. त्याचाच भाग म्हणून पुण्यातील आरटीओ इन्स्पेक्टर (सहायक मोटार वाहन निरीक्षक) पदावर कार्यरत असलेल्या धुळदेव कोकरे यांना त्यांच्याच विवाहात इतर आरटीओ अधिकार्यांनी नवदांपत्याला हेल्मेटची भेट देत, हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती केली.
आरटीओ इन्स्पेक्टर (सहायक मोटार वाहन निरीक्षक) धुळदेव कोकरे यांचा हर्षदा बंडगर यांच्याशी रविवारी (दि.4) विवाह सांगलीत पार पडला. या विवाहानिमित्त निमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंतराजे भोसले, युवराज पाटील यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. त्या वेळी धुळदेव कोकरे यांना हेल्मेट भेट देऊन, हेल्मेट वापरासंदर्भातील जनजागृती वर्हाडी मंडळींमध्ये केली.
सध्या 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत देशभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. यात परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षाविषयक विविध प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यात प्रामुख्याने हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट वापरणे, तसेच वाहतुकीचे नियम पाळणे, याविषयी नागरिकांना व रस्ता वापरकत्र्यांना जागृत केले जात आहे. रस्त्यांवर घडणार्या अपघातांना आळा घालण्याकरिता नियमितपणे वाहतूकविषयक नियमांचे कसोशीने पालन करण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.
त्याचाच भाग म्हणून आपल्या सहकार्याच्या लग्नात नवविवाहित दांपत्यांना पुणे आरटीओ कार्यालयाकडून भेटवस्तू म्हणून हेल्मेट देण्यात आले. त्याद्वारे उपस्थित नागरिकांना हेल्मेट वापराचा संदेश देण्यात आला. पुण्यातील आरटीओ अधिकार्यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आपले सहकारी इन्स्पेक्टर धुळदेव कोकरे यांना रविवारी त्यांच्या विवाहात हेल्मेट भेट देऊन, जनजागृती केली.
हेही वाचा