Ujani Dam Fishermen Protest: उजनीत मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन; दोन महिला बेशुद्ध, लेखी आश्वासनासाठी ठाम भूमिका

सौरऊर्जा प्रकल्प व ठेकेदारी पद्धतीला विरोध; ‘उजनी आमच्या हक्काची’च्या घोषणांनी परिसर दणाणला
Ujani Dam Fishermen Protest
Ujani Dam Fishermen ProtestPudhari
Published on
Updated on

पळसदेव: "कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही", "ठेकेदारी पद्धत रद्द करा, सौरऊर्जा प्रकल्प रद्द करा", "उजनी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची" अशा घोषणांनी आज पाळदेव येथील उजनी परिसर दणाणून गेला. यावेळी झालेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान २ तास पाण्यात राहिल्याने २ महिला बेशुद्ध पडल्या. स्थानिक मच्छीमार बांधवांनी सौर ऊर्जा प्रकल्प आणि ठेकेदारी पद्धतीच्या विरोधात सोमवारी (दि. ३१) सकाळी ११ वाजता जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली.

Ujani Dam Fishermen Protest
Maharashtra Monsoon Rainfall Deficit: अल-निनोचा दणका! महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट; ३२ जिल्ह्यांत पावसाची तूट

गेल्या महिन्यात सोलापूर येथे झालेल्या आंदोलनात प्रशासनाने कोणताही तोडगा न काढल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र संताप होता. त्याचाच उद्रेक सोमवारी दिसून आला. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन तब्बल तीन तास चालले; मात्र प्रशासनाकडून कोणतेही लेखी आश्वासन न मिळाल्याने दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास संतप्त आंदोलकांनी थेट पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन अधिक तीव्र केले.

Ujani Dam Fishermen Protest
Pune Cantonment Board GST Refund: जीएसटीचा परतावा नाही, कटक मंडळाचे उत्पन्न आटले; पुणे कॅन्टोन्मेंटची विकासकामे रखडली

यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा उभा करून नदीकिनारी आंदोलकांना अडविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आंदोलक मागे हटले नाहीत. "जोपर्यंत ठेकेदारी पद्धत आणि सौर ऊर्जा प्रकल्प बंद करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही," अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news