Maharashtra Monsoon Rainfall Deficit: अल-निनोचा दणका! महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट; ३२ जिल्ह्यांत पावसाची तूट

१८ जिल्हे ‘रेड झोन’मध्ये; मराठवाड्यात २९, विदर्भात २५ टक्के पाऊस कमी
Rain
Rainfile photo
Published on
Updated on

­पुणे: अल-निनोचा प्रभाव यंदाच्या मान्सूनवर जबरदस्त झाला असून, १ जून ते ३० ऑगस्ट या ९० दिवसांच्या मान्सून हंगामात राज्यात सरासरी ११ टक्के तूट नोंदली गेली. राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यात कमी पाऊस पडला. त्यापैकी १८ जिल्हे अवर्षणग्रस्त ( रेड झोनमध्ये ) नोंदले गेले असून, १४ जिल्ह्यांत सरासरीच्या जेमतेम पाऊस झाला आहे. केवळ चार जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

Rain
Sahyadri Rainfall: अल निनोच्या प्रभावातही सह्याद्रीची पावसात बाजी!; ताम्हिणी घाटात ८ हजार ४२ मिमी, भिरात ८,७८२ मिमी पाऊस

मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव जून आणि ऑगस्ट या महिन्यात दिसून आला. तर जुलैमध्ये मात्र बहुतांश भागात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला. ऑगस्टमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात अनुक्रमे ६० ते ६५ टक्के पाऊस कमी झाला आहे. सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज आहे. कारण पहिल्या पंधरवाड्यात मान्सून राज्यातून परतीला निघतो. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे मोठे सावट तयार झाले आहे.

Rain
Sugar Price: साखरेचे दर उतरणार?; सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी केंद्राचा १३ लाख टनांचा मुबलक कोटा

१ जून ते ३० ऑगस्ट २०२६

  • महाराष्ट्र : ११ तूट ( सरासरीः ८०५.६, पडलाः ७१६.४) कोकणः ९ टक्के तूट (सरासरीः २४७८.२,पडलाः २२५८.४)

  • मध्य महाराष्ट्रः ८ टक्के जास्त (सरासरीः ५३८.९, पडलाः ६३१ )

  • मराठवाडा :२९ टक्के तूट (सरासरीः ४७४.६, पडलाः ३३६.२)

  • विदर्भः २५ टक्के तूट ( सरासरीः ७७१.७, पडलाः ५७९.२)

Rain
Sugar Factories FRP Payment: एफआरपीच्या हप्त्यांच्या करारात त्रुटी आढळल्यास कारखान्यांना दणका; साखर आयुक्तांच्या कडक सूचना

अतिवृष्टीचे जिल्हे (४)

नाशिक (५५ टक्के), सातारा (३९ टक्के), पुणे (३२ टक्के), पालघर (२८ टक्के)

खूप कमी पाऊस (रेड झोन )

सिंधुदुर्ग ३४, अहिल्यानगर २९, नंदूरबार ३९, सोलापूर ४६, बीड ४४, धाराशिव ३१, हिंगोली ४५, जालना ३८, लातूर २६, नांदेड २८, परभणी ३५, अकोला ३७, अमरावती ४८, चंद्रपूर ३३, गडचिरोली २०, नागपूर ३५, वर्धा २८, वाशिम ३०

Rain
Purandar Airport Illegal Plotting: ‘एअरपोर्ट व्ह्यू’च्या नावाखाली बेकायदा प्लॉटिंगचा धुमाकूळ; सासवड-जेजुरी परिसरात गुंठ्याला ३० लाखांपर्यंत भाव

कमी पाऊस...( उणे १३ ते १५ टक्के तूट )

कोल्हापूर ७, मुंबई शहर २, मुंबई उपनगर १५, रायगड ३, रत्नागिरी १३, ठाणे ४, धुळे ९, जळगाव ४, सांगली १३, छत्रपती संभाजीनगर ३, भंडारा १५, बुलडाणा १२, गोंदिया २, यवतमाळ १५

पावसाची तालुकावार स्थिती ( १ जून ते ३० ऑगस्ट )

राज्यात एकूण तालुके ३५५ अत्यल्प : (२५ टक्के : १४ तालुके - खूप कमीः ( ५० टक्के : १३० तालुके साधारणः (७५ टक्के : १३२ तालुके - मुसळधार : ( १०० टक्के: ७९ तालुके

(स्त्रोत : महारेन, राज्यशासनाची आकडेवारी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news