Pune District Central Cooperative Bank Election: पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांची चर्चा; प्रारूप मतदार यादी जाहीर

५ हजार ६४८ मतदारांचा समावेश; २३ ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत, ५ नोव्हेंबरला अंतिम यादी
Pune District Cooperative Bank
Pune District Cooperative BankPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी बुधवारी (दि.१४) प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार अ, ब, क आणि ड वर्ग संस्था सभासदांची संख्या ३ हजार ९८१ आणि व्यक्ती सभासदसंख्या १ हजार ६६७ मिळून एकूण ५ हजार ६४८ इतकी एकूण मतदारसंख्या होत आहे. त्यावर आता आक्षेप व हरकती २३ ऑक्‍टोबरपर्यंत घेता येणार आहेत. त्यानिमित्ताने बँकेच्या निवडणुकीसाठी प्राप्त माहितीनुसार विद्यमान संचालक, त्यांचे नातेवाईक, जवळच्या व्यक्तींचा समावेश विकास सोसायट्यांच्या मतदारसंघात केल्याने यंदा बँकेच्या संचालक मंडळावर बहुतांशी नवीन चेहऱ्यांची वर्णी लागण्याचे चित्र दिसून येत आहे.

Pune District Cooperative Bank
Smita Jadhav: पुण्यातील वकीलवर्गाचा पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा

अ वर्ग मतदारसंघातील तालुका सोसायटी मतदार संघातून नवीन चेहऱ्यांची नांवे ठरावात दिसून येत आहेत. एकूण १ हजार ३६४ मतदारसंख्या असून, विकास सोसायट्यांमधील तालुकानिहाय प्रमुख ठरावांमधील नांवे पुढीलप्रमाणे आहेत. आंबेगाव तालुक्यात बँकेचे विद्यमान संचालक आमदार दिलीप वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, देवदत्त जयवंतराव निकम अशी नावे ठरावातून आहेत. बारामती तालुक्यात स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाचाही ठराव असून, जय अजित पवार यांचाही ठराव आहे. प्रमोद काकडे, रंजनकुमार तावरे, सतीश काकडे, दत्तात्रय येळे, दिलीप खैरे, शहाजीराव मुकुटराव काकडे, विश्वास देवकाते या नावांचा समावेश आहे.

Pune District Cooperative Bank
Munitions India Limited Bribery Case: पुण्यात म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमधील कथित लाचखोरी उघड; कार्यकारी संचालकासह तिघांना अटक

भोर तालुक्यात विद्यमान संचालक संग्राम थोपटे, नितीन थोपटे, विक्रम खुटवड, तृप्ती खुटवड, चंद्रकांत बाठे यांचाही ठराव आहे. दौंड तालुक्यातून यंदा आमदार राहुल कुल, कांचन कुल, बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांच्यासह मंगल रमेश थोरात, तुषार रमेश थोरात, रवींद्र धंगेकर, वासुदेव काळे, वीरधवल जगदाळे यांचा समोवश आहे. हवेली तालुक्यातील ठरावांमध्ये विद्यमान संचालक विकास दांगट यांच्यासह प्रकाश म्हस्के, प्रकाश जगताप, दिलीप काळभोर, माणिकराव गोते, रोहिदास उंद्रे, सुरेश घुले, सोनाली अजिंक्य घुले यांचा समावेश आहे.

Pune District Cooperative Bank
Smita Jadhav: डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांना पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा पाठिंबा...!

इंदापूरमध्ये यशराज अप्पासाहेब जगदाळे, हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री हर्षवर्धन पाटील, तर जुन्‍नर तालुक्यात संजय काळे, प्रथमेश संजय काळे, संग्राम गणपतराव फुलवडे, भाऊ धोंडू देवाडे यांचा समावेश आहे. खेड तालुक्यातून संचालक दिलीप मोहिते पाटील, चंद्रशेखर शेटे, मंगल अरुण चांभारे यांच्या ठरावांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यातन संजय चंद्रकांत जगताप, विजय विनायक कोलते, तर शिरूरमधून अशोक पवार, वेल्ह्यातून उल्हास रेवणनाथ दारवटकर, निर्मला जागडे, रेवणनाथ दारवटकर यांच्या नावांचाही ठराव आहे. दरम्यान, प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींवर दि. २ नोव्हेंबरपर्यंत अंतिम निर्णय दिला जाईल, तर दि.५ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी जाहीर केले आहे.

Pune District Cooperative Bank
Maharashtra Legislative Council Elections: विधानपरिषदेच्या पाचही जागा जिंकण्यासाठी महायुतीचे नियोजन; फडणवीसांचा विश्वास

नवीन चेहरेच अंतिम होण्याची शक्यता

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सलग दहा वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच बँकेच्या संचालकपदी असलेल्या संचालकांवर कारवाई करण्याचा धडाका सध्या सुरू आहे. तसेच उच्च न्यायालयाचे निकालही तसे आल्याने ठरावांद्वारे सध्या स्पर्धेत असलेल्या संबंधित संचालकांवर कारवाईची टांगती तलवार यानिमित्ताने कायम राहणार आहे. त्यामुळे ठरावांद्वारे आपल्या जवळच्या नातेवाईकांचा समावेश करून अनेक संचालकांनी खबरदारी घेतल्याचे दिसून येत असून, तेच निवडणूक रिंगणात अंतिम होण्याची शक्यता अधिक आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर प्रथमच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सन २०२६-२७ ते २०३१-३२ या वर्षाकरिता निवडणूक होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ताकेंद्र ताब्यात ठेवण्यासाठी रणनीतीवर लक्ष केंद्रित करावे लागणार असून, प्रथमच भाजपचे आव्हान दिसण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news