उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बेगडी : चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : श्री राम मंदिर साकारल्याबद्दल जगभरातील हिंदू मोदीजींचे आभार मानत असून, रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण मिळूनही उद्धव ठाकरे गेले नाहीत, यातच त्यांचा नास्तिकपणा उघड झाला. त्यामुळे ठाकरेंचे बेगडी प्रेम आणि हिंदुत्व जनतेच्या लक्षात आले, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

अयोध्येत श्री राम दर्शनासाठीची रामभक्तांची आस्था रेल्वे मंगळवारी पुण्यातून मार्गस्थ झाली, त्यानंतर बावनकुळे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. ते म्हणाले, प्रभू श्री राम जन्मभूमी मंदिराचा खटला 2008 आणि 2011 ला सर्वोच्च न्यायालयात आला असता, श्री राम जन्मभूमीचे पुरावे तत्कालिन कँाग्रेस सरकारकडे मागितले गेले. हे पुरावे मागितल्यावर काँग्रेसच्या वकिलांनी रामलल्ला काल्पनिक असल्याचे सांगितले. पण, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आल्यावर जन्मभूमीचे पुरावे दिले आणि श्रीराम जन्मभूमी मंदिर साकारायला परवानगी मिळाली.

बावनकुळे म्हणाले, मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे किती खाली गेलेत हे कळले. शिवाय सावरकरांचा अपमान केला गेला, हिंदु सनातन धर्म संपवून टाकू, असे सांगणार्‍यासोबत ठाकरे यांनी युती केली काँग्रेसचे दर्शनाला कोणी गेले नाही, तर उद्धव ठाकरेंनी न जाण्याचा निर्णय घेतला, असा आरोपही त्यांनी केला.

अजित पवार राष्ट्रवादी पुढे नेतील

मी अजित पवारांचं अभिनंदन करतो की त्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळ हे चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाने अत्यंत महत्त्वपूर्ण हा निर्णय दिला. जेव्हा निवडणूक आयोगाचा निकाल येतो तेव्हा तो नियमाप्रमाणे व संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी आणि मतदारांचा कौल आहे. त्यांच्याकडे तो निकाल साधारणतः दिसतो. अजित पवार नक्कीच राष्ट्रवादीचे नेते म्हणून पक्ष म्हणून पुढे घेऊन जातील असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news