Pune Crime: संमोहनाद्वारे लुटणार्‍या दोघांना पकडले; साधू,भिक्षुकांच्या वेशात वावर

निमगाव केतकी ग्रामस्थांची सतर्कता
Pune Crime News
संमोहनाद्वारे लुटणार्‍या दोघांना पकडले; साधू,भिक्षुकांच्या वेशात वावर Pudhari
Published on
Updated on

इंदापूर: साधू भिक्षुकाचा वेष परिधान करून लूटमार करणार्‍या पंजाब राज्यातील दोन तरुणांना निमगाव केतकी (ता. इंदापूर) ग्रामस्थ व पोलिस पाटलांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवारी (दि. 9) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

मनी फर्नेश नाथ आणि अर्जुन साथ नाथ (दोघे रा. शेरपूर, ता. धुरी, जि. संगरुर, पंजाब) अशी पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव केतकी येथील संत सावतामाळी प्रतिष्ठानच्या व्यापारी गाळ्यातील सचिन धन्यकुमार दोषी यांच्याकडे मनी व अर्जुन नाथ हे दोघे गेले. तेथे दोषी हे एकटेच होते. दोषींना कोपर्‍यात नेत त्यांना संमोहित केले आणि त्यांना अंगठ्या काढून पाकीट देण्यास भाग पाडले. (Latest Pune News)

Pune Crime News
Water Crisis: आदिवासींची पाण्यासाठी पायपीट; कोपरे, मांडवे, जांभूळशी, मुथाळने गावात भीषण टंचाई

सुदैवाने याचवेळी तेथे उत्तम भोंग, तुकाराम भोसले हे दोघे आले. त्यामुळे दोघांनी त्यांना आत येण्यास प्रतिबंध केला. मात्र भोसले यांनी हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करण्यास सुरुवात केली असता त्या दोघांनी ऐवज टाकून तेथून पळ काढला.

ही घटना पोलिस पाटील अतुल डोंगरे यांना समजताच त्यांनी तत्काळ संबंधितांची छायाचित्रे गावातील सर्व सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल केले. काही वेळातच पाटील यांना ते दोघे आमच्या भागात आल्याचे मोबाईलवरून कळविण्यात आले.

Pune Crime News
Admission Process: पुण्यात नामांकित महाविद्यालयांचे पदवीप्रवेश सुरू

त्यानुसार त्या दोघांना शिवसेनेचे तालुका उपप्रमुख बबन खराडे, आशिष हुंबरे यांच्यासह ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान इंदापूरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी जीवन बनसोडे यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्या दोघांना मूळ गावी रवाना केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news