Pune: पश्चिम घाटात सापडल्या ’पैसा’च्या दोन नवीन प्रजाती; पुण्यातील शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा कलावते यांचा शोध

सध्या भारतात 270 पैसाच्या प्रजातींची माहिती उपलब्ध आहे. तसेच, 70 टक्क्यांहून अधिक प्रजाती देशांतर्गत
Pune News
दोन दुर्मीळ ‘पैसा’च्या (मिलीपीड) प्रजाती सापडल्याPudhari
Published on
Updated on

पुणे : पश्चिम घाटात देशातील दोन दुर्मीळ ‘पैसा’च्या (मिलीपीड) प्रजाती सापडल्या असून, शहरातील झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इडियाच्या प्राणिशास्त्रज्ञ डॉ. अपर्णा कलावते यांनी हे संशोधन जगातिक शोधनिबंधपत्रिकेत नुकतेच प्रसिद्ध केले आहे.

देशात 270 प्रजातींची ओळख

सध्या भारतात 270 पैसाच्या प्रजातींची माहिती उपलब्ध आहे. तसेच, 70 टक्क्यांहून अधिक प्रजाती देशांतर्गत आहेत. मात्र, पश्चिम घाटात पोलिड्रेपनम, झिफोसुम मुहसिना या जाती सापडल्या. या दोन नवीन पैसाच्या (मिलीपीड) असून, त्यांचे वर्णन न्यूझीलंड येथील वैज्ञानिक नियतकालिकेत प्रकाशित करण्यात आले आहे. या दोन्ही प्रजाती गुजरात, महाराष्ट्र आणि केरळ पश्चिम घाटात आढळल्या.

Pune News
Kidney Transplant Racket: पोर्श अपघात नंतर ससूनचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. तावरेचं आणखी एका प्रकरणात कनेक्शन

संशोधनात यांचा समावेश

पॉलीड्रेपॅनम या वंशातील एकूण सहा प्रजाती अस्तित्वात आहेत आणि त्या सर्वच्या सर्व पश्चिम घाटात असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले. पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेतील प्राणिशास्त्रज्ञ डॉ. अपर्णा सुरेशचंद्र कालवते, डॉ. सुधीकुमार अंबलापरंबिल, इरिंजालकुडा (केरळ) तसेच विद्यार्थिनी मोहसीना मुस्तफा (केरळ), पूजा मिसाळ-विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ (महाराष्ट्र) यांनी संशोधन केले आहे.

Pune News
Pune Crime News : शस्त्र परवाना प्रकरण; हगवणे बंधूंवर कोथरूड, वारजे पोलिसात गुन्हा

पर्यावरणातील भूमिका

पैसा हे सर्वांत मोठे मॅक्रोअ‍ॅथर्—ोपॉड्स (कीटकसद़ृश प्राणी) असून, ते पर्यावरणातील बदलाचे सूचक मानले जातात. ते विघटक म्हणून अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात. ते मृत शरीराचे विघटन करून सूक्ष्मजीवांची क्रिया सक्रिय करतात आणि मातीच्या पोषण मूल्यांमध्ये वाढ करतात. नायट्रोजनयुक्त पोषकद्रव्ये मातीत तयार होते. हे विषारी नसतात आणि मानवासाठी पूर्णतः निरुपद्रवी असतात. काही प्रजाती बचावासाठी स्वतःला गोळ्यासारखे गुंडाळतात किंवा चिडवणारा द्रव बाहेर टाकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news