पिंपरी : अंगावर भिंत पडल्याने दोघांचा मृत्यू, भोसरी एमआयडीसी परिसरातील घटना

File Photo
File Photo

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: बांधकाम सुरू असताना भिंतीचा काही भाग अंगावर पडल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना साई कॉलनी, तापकीर नगर, मोशी येथे गुरुवारी (दि. 15) सायंकाळी घडली. उत्तम नारायण मोरे आणि मेहबूब शेख (दोघेही रा. साई कॉलनी, तापकीर नगर, मोशी) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईकृपा कॉलनी येथील रहिवासी तात्याराव बाबुराव जाधव यांच्या घराचे प्लास्टरचे काम सुरू होते.

त्यांच्या घराच्या बाजूला पत्राशेड आहे. गुरुवारी सायंकाळी काहीजण या पत्राशेडमध्ये पत्ते खेळत बसले होते. जाधव यांच्या इमारतीला ड्रील मारताना भिंतीचा काही भाग अचानक पत्राशेडवर कोसळला. त्यावेळी पत्राशेडमध्ये खेळत बसलेले मेहबुब शेख आणि उत्तम मोरे हे भिंतीखाली गाडले गेले. त्यावेळी तेथे काम करीत असलेल्या कामगारांनी त्यांना त्वरीत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, मेहबूब याचा रूग्णालयात उपचार करण्यापूर्वी मृत्यू झाला. तर, उत्तम मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नव्हती. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news