खडकीत ‘दी बर्निंग ट्रेन’; मुंबई-चेन्नई यात्रा स्पेशल ट्रेनच्या दोन डब्यांना आग

खडकी रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल करताना एनडीआरएफचे जवान आणि उपस्थित अधिकारीवर्ग.
खडकी रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल करताना एनडीआरएफचे जवान आणि उपस्थित अधिकारीवर्ग.
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सकाळी 9.30 च्या सुमारास आपत्कालीन स्थिती सोडविणार्‍या यंत्रणांच्या टेबलांवरचे फोन खणाणले. फोन उचलल्यावर समोरून विचारणा 'हॅलो कोण', समोरच्या व्यक्तीने सांगितले, खडकी स्थानकावर मुंबई-चेन्नई यात्रा स्पेशल रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलासह सर्व जवानांची धावाधाव झाली. शहरातील आपात्कालीन स्थितीवर मात करणार्‍या सर्व यंत्रणा सतर्क आहेत की नाही हे पहाण्यासाठी मॉकड्रिलचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते.

पुणे-लोणावळा ट्रेन या मार्गावरील खडकी स्थानकावर मुंबई-चेन्नई पॅसेंजर स्पेशल ट्रेनच्या स्लीपर ड-1 आणि ड-4 डब्यांना आग लागली. असा फोन खडकी स्टेशन मास्तरांनी नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागीय नियंत्रण कक्षाकडून सर्व विभागांना तात्काळ माहिती देण्यात आली.

सर्व यंत्रणा बंदोबस्तासह अपघातग्रस्त डब्यातील प्रवाशांना वाचविण्यासाठी खडकी स्थानकावर सकाळी पोहोचल्या. अन् सुरू झाले बचाव कार्याचे मॉकड्रिल. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुरानी दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंग, विभागीय सुरक्षा अधिकारी देवेंद्र कुमार, वैद्यकीय पथक आणि रेल्वे संरक्षण दल घटनास्थळी पोहोचले. यासोबतच स्थानिक प्रशासन, पोलिस, वैद्यकीय विभाग घटनास्थळी पोहोचले.

या वेळी एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट दीपक तिवारी, विभागीय सुरक्षा अधिकारी पुणे देवेंद्र कुमार, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विजयसिंह दडस, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर, सहायक सुरक्षा आयुक्त स्वरूपकुमार गंगोपाध्याय व अन्य उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news