Trupti desai : आई नसते, तेव्हाच तिचे महत्त्व समजते! तृप्ती देसाई यांची खंत

Trupti desai : आई नसते, तेव्हाच तिचे महत्त्व समजते! तृप्ती देसाई यांची खंत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'आई आपल्यासोबत आहे तोपर्यंत तिला जपा. समाजात वाढत चाललेल्या वृद्धाश्रमांची संख्या कमी व्हायला पाहिजे. आई गेल्यावर तिचे महत्त्व आपल्याला कळते, परंतु तेव्हा उशीर झालेला असतो,' अशी खंत भूमाता बि—गेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आदर्श माता पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

या वेळी गोकूळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक, आमदार रवींद्र धंगेकर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. आमदार सत्यजित तांबे यांच्या मातोश्री दुर्गाबाई तांबे, आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मातोश्री रुक्मिणी धंगेकर आणि आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्या मातोश्री डॉ. मनोरमा खेडकर यांना प्रदान करण्यात आला.

महाडिक म्हणाल्या, समाजामध्ये वावरताना जेव्हा मोठी झालेली माणसे बघतो तेव्हा त्यांना घडविणार्‍या त्यांच्या माता असतात, हे विसरता कामा नये. राजकारणामध्ये प्रशासनामध्ये चांगल्या लोकांनी येणे गरजेचे आहे. बदलत्या काळाप्रमाणे आईची भूमिकादेखील बदलली आहे. मुलांना चांगले बनविण्यासाठी आपण चांगले बनले पाहिजे. या वेळी आमदार रवींद्र धंगेकर, दुर्गाबाई तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी आभार मानले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news