बेळगाव: रताळी हंगाम सुरू, मलकापूर जातीच्या रताळ्यांना सर्वाधिक दर | पुढारी

बेळगाव: रताळी हंगाम सुरू, मलकापूर जातीच्या रताळ्यांना सर्वाधिक दर

बेळगाव: पुढारी वृत्तसेवा: बेळगाव तालुक्यात पावसाळी रताळी खरेदी हंगामाला सुरुवात झाली आहे. मलकापूर जातीच्या रताळ्यांना प्रतिक्विंटल २५०० रूपये दर मिळाला आहे. तर जवारी रताळ्यांना १५०० रुपये दर मिळाला आहे. एपीएमसी मार्केट यार्ड येथे सरोळी (ता.चंदगड) येथील ईश्वर दत्तू पाटील व बेळगुंदी (ता. बेळगाव) येथील अर्जुन चौगुले यांच्या रताळ्यांना हा दर मिळाला.

रताळी उत्पादकांना फेटा बांधून रताळी व्यापारी दत्ता पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर रताळी उत्पादकांच्या हस्ते रताळ्यांचे पूजन करण्यात आले. रताळी व्यापारी दत्ता पाटील, संजय खोराटे, प्रकाश मेलगे, सोमनाथ बोंद्रे, मावळू पाटील आदीसह कर्मचारी उपस्थित होते.

बेळगावचे रताळी रुचकर म्हणून प्रसिद्ध आहेत. येथून महाराष्ट्रसह उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब या ठिकाणी येथील रताळी जातात. यंदा उन्हाळ्यातही रताळ्यांची मोठी लागवड केल्यामुळे बारा महिने रताळ्यांची कमी जास्त प्रमाणात आवक होत आहे. सध्या पावसाळी रताळी हंगामाला प्रारंभ झाला आहे. दर चांगला मिळाल्याने रताळी उत्पादकांना आशेचा किरण दिसू लागला आहे.

हेही वाचा 

Back to top button