Newborn Jaundice Test: नवजात शिशूंची आता रक्ताशिवाय होणार कावीळ तपासणी

वेदना कमी करणारी यंत्रणा लवकरच महापालिकांच्या रुग्णालयात
Newborn Jaundice Test
Newborn Jaundice TestPudhari
Published on
Updated on

पुणे: नवजात बालकांमध्ये होणाऱ्या कावीळ (जॉन्डिस) आजाराचे निदान आता रक्त न काढता करता यावे, यासाठी ‌‘ट्रान्सक्युटेनियस बिलिरुबिन मीटर‌’ खरेदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

ही अत्याधुनिक उपकरणे शहरातील मनपाच्या सर्व 19 रुग्णालयांमध्ये टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार आहे. नवजात शिशूंच्या आरोग्यसेवेला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी महापालिकेने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिली.

Newborn Jaundice Test
Baramati-Rahuri By Election Voting: बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज मतदान

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्रसूतींचे प्रमाण मोठे असल्याने नवजात शिशूंची नियमित तपासणी अत्यंत आवश्यक ठरते. विशेषतः कावीळ हा आजार नवजात बालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. सध्या कावीळ तपासण्यासाठी बाळाच्या रक्ताचा नमुना घ्यावा लागतो; मात्र नव्या बिलिरुबिन मीटरमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेदनारहित होणार आहे.

Newborn Jaundice Test
Weather Update: राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी सुरूच राहणार

लवकर निदान करून उपचार होणार शक्य

कावीळचे प्रमाण वेळेत ओळखले नाही, तर गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या आधुनिक यंत्रणेमुळे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार मिळतील आणि बालमृत्यू दर कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news