एनडीए रस्त्यावर वाहतूक कोंडी; अतिक्रमणांमुळे समस्या गंभीर

एनडीए रस्त्यावर वाहतूक कोंडी; अतिक्रमणांमुळे समस्या गंभीर
Published on
Updated on

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : एनडीए-शिवणे रस्त्यावर दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिकांसह पर्यटक त्रस्त झाले आहेत. रुंदीकरण होऊनही प्रशासन सुस्तावल्याने अतिक्रमणांचा विळख्यात रस्ते अडकून पडले असल्याचे गंभीर चित्र रविवारी (दि. 7) सुटीच्या दिवशी दिसून आले. दुपारपासून रात्रीपर्यंत कोंढवे धावडेपासून शिवणेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उत्तमनगर चौक, कोपरे गाव रस्ता, कोंढवे धावडे चौक आदी ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

वाहतूक पोलिस, वॉर्डन तैनात असूनही वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. कोंढवे धावडेपासून शिवणेपर्यंतच्या दोन किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी अर्धा ते एक तास नागरिक अडकून पडत आहेत. भाजीपाला विक्रेते, दुकानदार, वाहनांची पार्किंगमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. रुग्णवाहिका, लष्कराच्या वाहनांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. वाहतूक कोंडी, अतिक्रमणांच्या विळख्यातून पादचार्‍यांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.

कोथरूड, वारजे भागातून खडकवासलासह सिंहगडकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने एनडीए रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. रस्त्याचे रुंदीकरण होऊनही वाहतूक कोलमडली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.

-अरुण दांगट, भाजप संघटक

या रस्त्यावर रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल सुरू आहेत. महापालिका प्रशासन व पोलिसांनी समन्वयाने उपाययोजना आणि वाहतूक नियमावली तयार करावी.

-अनिता इंगळे, माजी सदस्या, जिल्हा परिषद

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news