नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्ताने सराफ बाजाराला झळाळी मिळाली आहे. नाशिकमध्ये सोमवारी (दि. ८) सोन्याच्या २४ कॅरेटचे दर प्रति तोळा ७३ हजार ५०० रुपये होते. तर २२ कॅरेटचे प्रति तोळ्याचे दर ६७ हजार २०० रुपयांवर पोहचले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारातील दर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीतही गुंतवणूक वाढली असून चोख चांदीचे प्रति किलोचे दर ८३ हजार ५०० रुपये नोंदविण्यात आले. सोने व चांदीकडे सध्या सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे साेने-चांदीच्या झळाळीने सराफ बाजार ऊजळून निघाला आहे.
हेही वाचा: