सलग सुट्यांमुळे सिंहगड, राजगडावर पर्यटकांची धाव

सलग सुट्यांमुळे सिंहगड, राजगडावर पर्यटकांची धाव

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सलग सुट्यांमुळे सिंहगड ,राजगडावर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. रविवारी(दि. 13) सिंहगडावर रिमझिम पावसात पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटला. सिंहगड टोलनाक्यावर पर्यटकांकडून तब्बल 1 लाख 23 हजार रुपयांचा टोल वसुल करण्यात आला. लागोपाठच्या सुट्यांमुळे वन तसेच हवेली पोलिसांनी वाहतूक नियोजन केल्याने गेल्या रविवारच्या तुलनेत आज काही प्रमाणात सिंहगड घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी कमी झाली. दुपारी एकनंतर पर्यटकांनी गर्दी केली.

त्यामुळे घाट रस्त्यावरील वाहतूक कोलमडली. कोंढापूर फाट्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद करण्यात आली. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वाईकर, संदीप कोळी, नितीन गोळे आदींसह सुरक्षा रक्षक सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्यासाठी भरपावसात धावपळ करत होते. हवेली पोलिसांनी पुणे -पानशेत रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करून खडकवासला धरण चौपाटी तसेच वाहतूक कोंडीच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. राजगड किल्ल्यावर दिवसभरात अडीच हजारांवर पर्यटकांनी हजेरी लावली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news