Sinhagad Tourist Missing: ‘सिंहगड’च्या तानाजी कड्यावरून खोल दरीत कोसळून पर्यटक बेपत्ता

सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कडा येथे हवा पॉइंटजवळील खोल दरीत पाय घसरून पडल्याने पर्यटक बेपत्ता झाला आहे.
Sinhagad Fort
‘सिंहगड’च्या तानाजी कड्यावरून खोल दरीत कोसळून पर्यटक बेपत्ताFile Photo
Published on
Updated on

Pune tourist accident

खडकवासला: सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कडा येथे हवा पॉइंटजवळील खोल दरीत पाय घसरून पडल्याने पर्यटक बेपत्ता झाला आहे. गौतम गायकवाड वय (24, सध्या राहणार हैदराबाद , मूळ रा. फलटण, सातारा) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे.

हैदराबाद येथून गौतमसह महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे , सूरज माळी असे 5 जण पुणे येथे फिरण्यासाठी आले होते. बुधवारी दुपारी 4:30 वाजता ते सिंहगडावर आले. या वेळेस सायंकाळच्या सुमारास तानाजी कड्याजवळ ते आले असता गौतम याने लघवीला जाऊन येतो, असे मित्रांना सांगितले. (Latest Pune News)

Sinhagad Fort
Akshay kumar Arshad Warsi summoned: अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजीर हो! वकीलांवर असभ्य भाषेत विनोद केल्याप्रकरणात समन्स

मात्र, बर्‍याच वेळानंतरही तो परत आला नाही. म्हणून मित्रांनी गौतम याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही . जवळच हवा पॉइंटशेजारी त्याची चप्पल सापडली, मात्र तो दिसला नाही . सिंहगड भागात मुसळधार पाऊस असून, वार्‍याचा वेगही जास्त आहे. वार्‍याचा व जमिनीचा अंदाज न आल्याने गौतम खोल दरीत कोसळला.

मित्रांनी 7:45 मिनिटांनी 100 नंबरवर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. यानंतर हवेली पोलिस स्टेशनचे सचिन वांगडे यांनी त्वरित घटनास्थळी पीएसआय दिलीप शिंदे, गुलाब आंबेकर व पोलिस हवालदार समाधान चोरमले यांना तातडीने घटनास्थळी पाठवले व हवेली आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधत त्यांना घटनेची माहिती दिली .

Sinhagad Fort
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवात आकर्षण ठरतेय जुन्या मंदिरांची प्रतिकृती

आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले, पोलिस पाटील गणेश सपकाळ, संजय चोरघे, संदीप सोळसकर , सूरज कवडे, वन विभागाचे विकास जोरकर यांनी खोल दरीत जाऊन मुसळधार पाऊस, वार्‍यात बेपत्ता गौतम याचा शोध घेतला, मात्र रात्रीच्या अंधारात तो आढळून न आल्याने रात्री 11 वाजता शोधकार्य थांबवले. उद्या सकाळी 6 वाजता पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news