Toral India Harvard Business School: हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये भरत गीते यांची दखल; यशोगाथा जागतिक स्तरावर

ॲल्युमिनियम कास्टिंग क्षेत्रातील प्रवासावर आधारित केस स्टडी; ग्रामीण भारताशी उद्योग जोडण्याचा आदर्श
Toral India Harvard
Toral India HarvardPudhari
Published on
Updated on

पुणे: ॲल्युमिनियम सँड कास्टिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी तौराल इंडिया आणि उद्योगांना ग््राामीण भारताशी जोडू पाहणारे उद्योजक, ‌‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया‌’ अशी ओळख असलेले भरत गीते यांची यशोगाथा जगातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या केस स्टडीमधून मांडण्यात आली आहे.

Toral India Harvard
Pune Traffic Police Bribery: वाहनचालकांकडून ऑनलाईन पैसे उकळणाऱ्या पोलिसांना दणका, व्हायरल व्हिडिओमुळे नाचक्की; दोघे निलंबित

या माध्यमातून तौराल इंडिया जागतिक स्तरावर अभ्यासल्या जाणाऱ्या निवडक कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवणारी कंपनी ठरली आहे. ही केस स्टडी तौरल इंडियाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या उच्च-प्रिसिजन ॲल्युमिनियम कास्टिंग व्यवसायाच्या प्रवासावर आधारित आहे. जर्मनीस्थित थोनी आलुटेक या कंपनीसोबतच्या संयुक्त उपक्रमातून सन 2016 मध्ये सुरू झालेल्या या प्रवासाचा मागोवा या अभ्यासात घेण्यात आला आहे. ऊर्जा, रेल्वे, संरक्षण आणि एरोस्पेस यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना सेवा देणाऱ्या जागतिक स्तरावरील उत्पादन व्यासपीठापर्यंत झालेल्या कंपनीच्या प्रगतीचा यात समावेश आहे.

Toral India Harvard
Forest Carbon Absorption Climate Change: हवामान बदलाचा परिणाम:भारतातील जंगलांची कार्बन शोषणक्षमता घटली; शास्त्रज्ञांचा महत्त्वाचा निष्कर्ष

हार्वर्ड बिझनेस स्कूलमधील वरिष्ठ प्राध्यापक व्ही. जी. नारायणन यांनी ही केस स्टडी तयार केली असून, मुंबईतील हॉटेल ताज लँड्‌‍स एन्डमध्ये मंगळवारी त्यांनी या केस स्टडीचे सादरीकरण केले. भरत गीते व माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह उद्योग, शिक्षण व धोरणात्मक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. परंपरागत औद्योगिक पार्श्वभूमी किंवा नेटवर्क नसतानाही पहिल्या पिढीतील उद्योजक जागतिक स्तरावरील उद्योग कसा उभारू शकतात, याबाबतचे विश्लेषण प्रा. व्ही. जी. नारायणन यांनी यामधून मांडले आहे.

Toral India Harvard
Pune Fake Police: पुण्यात भाजीविक्रेत्याचा बनावट पोलिस बनण्याचा धक्कादायक प्रकार; सोसायटीत पेढे वाटून फ्लेक्स लावला, गुन्हा दाखल

प्रा. व्ही. जी. नारायणन म्हणाले, तौरल इंडियाचा प्रवास उदयोन्मुख बाजारपेठेत उत्पादनक्षमता उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांवर केंद्रित आहे. जागतिक सहकार्य, उच्च तंत्रज्ञान आणि स्थानिक अंमलबजावणी यांच्या संगमातून सक्षम व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उद्योग कसा उभा राहू शकतो, याचे हे उदाहरण आहे. ‌‘तौराल इंडिया‌’चा प्रवास केवळ उद्योगक्षेत्रापुरता मर्यादित न राहता, नव्या पिढीतील उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यातूनही एखादा तरुण उद्योजक झाला, तर या केस स्टडीचा उद्देश साध्य झाल्याचे समाधान मिळेल.

Toral India Harvard
Pune PMPML Bus Accident: पुण्यात पीएमपीएमएल बस दुकानाला धडकली; अप्पा बळवंत चौकात अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

सन 2016 मध्ये स्थापना झालेली तौराल इंडिया आज चाकण (पुणे) आणि सुपा (अहिल्यानगर) या दोन उत्पादन प्रकल्पांसह ॲल्युमिनियम कास्टिंग उत्पादक म्हणून विकसित झाली आहे. ‌‘मेक इन इंडिया‌’ आणि ‌‘आत्मनिर्भर भारत‌’ या दोन गोष्टींशी भावनिक बंध असून, 2000 सहकारी कर्मचाऱ्यांचा हा परिवार झाला आहे. उद्योगांना ग््राामीण भागाकडे घेऊन जाण्याचे ध्येय आहे, असे भरत गीते यांनी यावेळी नमूद केले.

हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण: गीते

भरत गीते म्हणाले, हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये केस स्टडी म्हणून निवड होणे, हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आमचा प्रवास मूलभूत तत्त्वांवर आधारित असून, मर्यादांवर मात करत भारतीय उत्पादन जागतिक दर्जाचे बनू शकते, हे सिद्ध करण्याचा आहे. योग्य दृष्टिकोन, शिस्त आणि भागीदारीच्या आधारे भारतासाठी आणि जगासाठी उच्च गुणवत्तेचे, प्रीसिजन आधारित अभियांत्रिकी उपाय आणि टिकावू उत्पादन मूल्य निर्माण करता येते, हा आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news