Pune Fake Police: पुण्यात भाजीविक्रेत्याचा बनावट पोलिस बनण्याचा धक्कादायक प्रकार; सोसायटीत पेढे वाटून फ्लेक्स लावला, गुन्हा दाखल

पोलिस भरती न होताही तरुणाने स्वतःला पोलिस दाखवले; सोशल मीडियावर वर्दीतील फोटो ठेवून फसवणूक केल्याचा प्रकार उघड
Fake Police
Fake PolicePudhari
Published on
Updated on

पुणे: भाजीविक्रेत्या तरुणाने आपण पोलिस झाल्याचे सांगून सोसायटीत पेढे वाटले. एवढेच काय तर चौकात अभिनंदनाचा फ्लेक्स देखील लावला. पोलिसांना वाटले कोण आपल्या हद्दीत पोलिस झालाय हे पाहून त्याला अभिनंदनासाठी बोलवावे, पण पोलिसांच्या चौकशीत भलताच प्रकार समोर आला.

Fake Police
Pune PMPML Bus Accident: पुण्यात पीएमपीएमएल बस दुकानाला धडकली; अप्पा बळवंत चौकात अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

प्रत्यक्षात तो पोलिस भरती झाला नसताना त्याने तसे भासवून फ्लेक्स लावले. पोलिस वर्दीतील फोटो काढून मोबाईलमध्ये व्हॉटसअप स्टेटसवर ठेवले. याप्रकरणी नऱ्हे पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ऋषिकेश राजू जाधव (वय 26, रा. तिडके डेअरी, नऱ्हे रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Fake Police
Pune Water Supply Scheme Delay: पुणे समान पाणीपुरवठा योजना रखडली: परवानग्यांच्या चक्रव्यूहात 1558 कोटींचा प्रकल्प अडकला

ऋषिकेश जाधव हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला पोलिस व्हायचे होते. पण उंचीमुळे ते काय शक्य झाले नाही. तसेच त्याच्या घरचे लग्नाचा विचार करू लागले होते. त्यामुळे त्याने आपल्या आईला पोलिस झाल्याचे खोटे सांगितले.

Fake Police
Maharashtra 11th admission: अकरावी प्रवेश ऑनलाइन; या कागदपत्रांची आवश्यकता भासणार

सोसायटीमध्ये पोलिस झाल्याबद्दल पेढे देखील वाटले. घराबाहेर फ्लेक्स लावला. त्यात महाराष्ट्र पोलिस दलाचे चिन्ह, आपल्या फोटोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फोटो, खाली ऋषिकेश जाधव यांची पुणे शहर पोलिसपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे फ्लेक्सवर लिहिले होते. दोन दिवसांपूर्वी हा फ्लेक्स लावला होता.

Fake Police
Maharashtra ITI Daksh Project: पुण्यातील आयटीआय ‘दक्ष’ प्रकल्पात; कौशल्य विकासाला नवी चालना

पोलिसांनी चौकशी केल्यावर तो सार्वजनिक सेवक अथवा सरकारी नोकर नसताना पोलिसमध्ये भरती झाल्याचे भासविले. पोलिस वर्दीमधील फोटो मोबाईलमध्ये व्हॉटसअप स्टेट्‌‍सवर ठेवल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस फौजदार शिंदे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news