Pune News : पुणे जिल्ह्यात होणार दीड कोटी टनांहून अधिक ऊस गाळप

Pune News : पुणे जिल्ह्यात होणार दीड कोटी टनांहून अधिक ऊस गाळप
Published on
Updated on
पुणे : जिल्ह्यात चालू वर्ष 2023-24 च्या गाळप हंगामात  17 साखर कारखान्यांकडून 1 कोटी 51 लाख  टनाइतके ऊस गाळप होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऊस गाळप़ात गतवर्षापेक्षा यंदाच्या हंगामामध्ये अंदाजे 24 लाख टनाइतकी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी दिली.
राज्यात यंदाच्या हंगामात उस उपलब्धता कमी आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील स्थिती नेमकी उलट आहे. कारखान्यांकडून गतवर्षी जिल्ह्यात 1 कोटी 26 लाख 91 हजार 650 टनाइतके ऊस गाळप झाले होते. त्या तुलनेत पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादनात वाढ होऊन ते सुमारे दीड कोटी टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. 

यंदाच्या हंगामातील ऊस उपलब्धतेसाठी जिल्ह्यातील 11 सहकारी आणि 6 खासगी साखर कारखान्यांची बैठक घेऊन यंदाच्या ऊस उपलब्धतेची माहिती निश्चित करण्यात आली. कृषी विभागाकडूनही माहिती संकलित करून एकत्रित आकडेवारी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार हंगामात कारखान्यांकडे असलेले आडसाली उसाचे क्षेत्र 96 हजार 822 हेक्टर, पूर्वहंगामी लागवडीतील ऊस क्षेत्र 19 हजार 857 हेक्टर, सुरू लागवडीतील क्षेत्र सुमारे 26 हजार 360 हेक्टर इतके आहे.

कारखानानिहाय अपेक्षित ऊस गाळप (टनात)

श्री विघ्नहर सहकारी, जुन्नर – 10,00,000
दि माळेगाव सहकारी, शिवनगर, बारामती – 12,00,000
भीमा सहकारी (श्री साईप्रिया शुगर्स), दौंड – 9,00,000
भीमाशंकर सहकारी, आंबेगाव – 9,00,000
श्री सोमेश्वर सहकारी, बारामती – 13,65,122
राजगड सहकारी, भोर – 1,50,000
निरा-भीमा सहकारी – 6,00,000
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी, इंदापूर – 7,00,000
श्री संत तुकाराम सहकारी, मुळशी – 5,00,000
रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी, शिरूर – 6,00,000
श्री छत्रपती सहकारी, इंदापूर – 10,00,000
अनुराज शुगर्स, यवत-दौंड – 3,00,000
श्री नाथ म्हस्कोबा, दौंड – 6,00,000
व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लि., शिरूर – 6,75,000
पराग अ‍ॅग्रो फुडस, शिरूर – 7,00,000
दौंड शुगर प्रा. लि. दौंड – 20,00,000
बारामती अ‍ॅग्रो, बारामती – 20,00,000

दौंड शुगर, बारामती, सोमेश्वर, माळेगावकडे सर्वाधिक ऊस

जिल्ह्यात होणार्‍या सुमारे दीड कोटी टन ऊस उपलब्धतेमध्ये सर्वाधिक ऊस गाळप करण्यात चार साखर कारखाने आघाडीवर आहेत. त्यामध्ये दौंड शुगर आणि बारामती अ‍ॅग्रो या खासगी कारखान्यांकडून प्रत्येकी 20 लाख टन, श्री सोमेश्वर सहकारी 13.65 लाख टन, दि माळेगाव सहकारी 12 लाख तर श्रीछत्रपती व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडून प्रत्येकी 10 लाख टन ऊस गाळप होण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news