

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील भाजी मंडईमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे स्वयंपाक घरातून गायब झालेला टोमॅटो आता उपलब्ध झाला आहे. मात्र आलं आणि लसणाचे दर आवाक्याबाहेरच आहेत. तर, पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण होऊन, कोथिंबिरीच्या जुडीची विक्री पाच रुपयाला आहे. तसेच श्रावण सोमवार सुरू होणार असल्याने काकडी, बटाटा, श्रावणी घेवडा यांना अधिक मागणी असल्याचे दिसून आले.
शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईमधील किरकोळ बाजारात 150 ते 200 रुपये असलेले टोमॅटोचे दर गेल्या आठवड्यापासून घटले असून, चाळीस ते पन्नास रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. तर आलं-लसूण प्रत्येकी प्रतिकिलो अडीचशे रुपये दराने विक्री होत आहेत. त्यामुळे यांची खरेदी करणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर होऊन गेले. तर, कांदा आणि बटाट्याचे दरही कासव गतीने वाढत असल्याचे चित्र बाजारात दिसून आले. पालक, मेथी, मुळा, पुदीना जुडी प्रत्येकी दहा रुपये दराने विक्री होत आहे.
लसूण 26, आले 16, टोमॅटो 307, हिरवी मिरची 106, कोबी 198, कांदा 394, बटाटा 1302, भेंडी 82, कारली 35, शेवगा 29 क्विंटल एवढी आवक झाली आहे.
घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर ः आलं 90, लसून 95, हिरवी मिरची 35 ते 40, कोबी 10 ते 12, टोमॅटो 15 ते 20, कांदा 15 ते 20, बटाटा 15 ते 17, भेंडी 35 ते 40, मटार 40 रुपये दराने विक्री होत आहे.
मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 47,800 गड्डी, फळे 247क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 3,657 क्विंटल एवढी आवक झाली.
पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या ः दर (प्रति जुडी)
मेथी 10
कोथिंबीर 5
कांदापात 10
शेपू 10
पुदिना 10
मुळा 10
चुका 10
पालक 10
फळभाज्यांचे ः किलोचे भाव
कांदा 30 ते 35
बटाटा 30
आलं 250
लसून 250
भेंडी 60
टोमॅटो 40 ते 50
सुरती गवार 70 ते 80
गावरान गवार 100 ते 110
दोडका 60
दुधी भोपळा 60
लाल भोपळा 60 ते 70
कारली 60
वांगी 60
भरीताची वांगी 70
तोंडली 50
पडवळ 100
फ्लॉवर 60 ते 70
कोबी 30 ते 40
काकडी 30 ते 40
शिमला 60 ते 70
शेवगा 60 ते 70
हिरवी मिरची 55 ते 60