Crime News : गावठी पिस्तूल बाळगणारे तिघे जेरबंद

Crime News : गावठी पिस्तूल बाळगणारे तिघे जेरबंद

शिरूर : पुढारी वृत्तसेवा :  मध्य प्रदेश येथून गावठी पिस्तूल आणणार्‍या तीन संशयितांना आलिशान वाहनासह शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. निखिल एकनाथ चोरे (वय 20, रा. डोंगरगण, ता. शिरूर), विकास बाबाजी चोरे (वय 22) आणि शुभम सुरेश चोरे (वय 20) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून इंडेवर गाडी, 3 गावठी पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश येथून निखिल चोरे हा शिरूर बसस्थानक येथे येणार असून, त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व 4 काडतुसे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून निखिलला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता बॅगमध्ये पिस्तूल व 4 जिवंत काडतुसे पोलिसांना मिळाली. यानंतर त्याला अटक करून कसून चौकशी केली असता संशयित विकास व शुभम चोरे यांनी इंडेवर कार (एमएच 12 एसएच 3344) यामध्ये मध्य प्रदेश येथून 2 पिस्तूल व 6 जिवंत काडतुसे आणल्याचे सांगितले. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत पिस्तूल व काडतुसे जप्त केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, अमोल
पन्हाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले, एकनाथ पाटील, सहायक फौजदार गणेश देशमाने, पोलिस हवालदार परशराम सांगळे, पोलिस नाईक नाथसाहेब जगताप, रघुनाथ हळनोर, नितेश थोरात, सचिन भोई, अर्जुन भालसिंग, दीपक पवार यांनी केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news