मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दरड कोसळली; माती काढण्याचे काम सुरु

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दरड कोसळली; माती काढण्याचे काम सुरु

खोपोली, पुढारी वृत्तसेवा :  मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रविवारी १०.३५ वाजता मौजे आडोशी गावच्या हद्दीत डोंगर भागातून दरड कोसळली. दरड कोसळल्यानंतर मातीचा लगदा हा मुंबई बाजूच्या तिन्ही लेन वरती पडलेला आहे. मुंबई लेनवरिल वाहतूक थांबलेली आहे.  सदरचा मातीचा लगदा हा आय आर बी चे जेसीपी, डंपरच्या सहाय्याने काढून घेण्याचे काम चालू आहे.

साधारणतः २० ते २५ डंपर लगदा रोड मध्ये पडलेला आहे. दरड कोसळल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशनचा स्टाफ उपस्थित असून लगदा काढण्याचे काम चालू आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news