

पुणे : पुढारी वृत्तसेवा
पेबल या भारतीय कंपनीने पेबल पेस प्रो स्मार्टवॉच सादर केले आहे. या घड्याळात फिटनेस लेव्हल मोजणारा सेन्सर बसवलेला असल्याने हे घड्याळ रक्तातील ऑक्सिजन सुद्धा मोजू शकते.
पेबल पेस प्रो या स्मार्टवॉचचा डिस्प्ले १.७ इंचाचा असून हा डिस्प्ले एच डी कव्हर्ड असणार आहे. हे घड्याळ यूजर फ्रेंडली असल्याने अॅक्सेसीबल मेन्यू शॉर्टकट आणि क्लस्टर फ्री युजर इंटरफेस देखिल असणार आहे. यात ८ प्रायमरी मोडस् बरोबरच स्पोर्टस् मोडही आहे. यातील सेन्सर चालतानाची पावलं मोजून किती कॅलरीज बर्न झाले हे सांगेल; तसेच हार्ट रेट, रक्तातील ऑक्सिजन लेव्हल आणि ब्लड प्रेशर लेव्हलवरदेखील लक्ष ठेवेल.
या घड्याळात हायड्रेशन अलर्ट बरोबरच महिलांच्या आरोग्यासाठी खास अलर्ट सिस्टिम देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर या घड्याळाचा वापर १५ दिवसांपर्यंत करता येतो. एलॉय बॉडी असलेल्या या घड्याळामध्ये १०० हून अधिक वॉच फेस देण्यात आले आहेत. गोल्डन ब्लॅक, जेट ब्लॅक, मेटॅलिक ब्ल्यू आणि, आयवोरी या चार रंगात हे घड्याळ उपलब्ध आहे.
पेबल पेस प्रो या स्मार्टवॉचची किंमत २,९९९ रूपये आहे. हे घड्याळ ई-कॉमर्स साइटवर देखील उपलब्ध असल्याने याची ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.
https://youtu.be/fw-3g-eGj0Y