‘थर्टी फर्स्ट’ निर्बंधात होणार साजरा

'Thirty First' will be celebrated under restrictions
'Thirty First' will be celebrated under restrictions

धांगडधिंगा करणार्‍यांवर फिरत्या पथकांचा 'वॉच'

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी उत्साहाने साजरे केल्या जाणार्‍या थर्टी फर्स्टवर निर्बंध आणले आहेत. कोरोना तसेच ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीयांकडून मोठा जल्लोष केला जातो. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. 31) दुपारी चार ते रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तसेच फिरत्या पथकांचा 'वॉच' राहणार आहे.

मद्यपान करून वाहने दामटण्याचे प्रकार होतात. त्यासाठी शहरात ठिकिठिकाणी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात येणार आहे. संशयित वाहन व चालकांची तपासणी करण्यात येणार आहे.

थर्टी फस्ट साजरे करण्यासाठी शहरात मोठया प्रमाणात युवक-युवती एकत्र येतात. यंदा शासनाने निर्बंध लागू केल्याने अनेकांनी हॉटेलमध्ये जाणे टाळले.

हिंजवडी, वाकड, सांगवी, चिंचवड, पिंपरी यासह मुख्य ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे. शहरात प्रवेश करण्याच्या आणि शहराबाहेर पडण्याच्या मार्गावर प्रमुख ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

वाहतूक शाखेला त्याबाबत सुचना दिल्या आहेत. दरम्यान, यंदा बंदोबस्त करणार्‍या पोलिसांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे. शहरात रात्री उघड्यावर झोपलेले, फिरस्ते, निर्वासित यांना दोन हजार ब्लँकेट देण्यात येणार आहे.

आयुक्तालयांतर्गत 29 ठिकाणी नाकाबंदी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत 29 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. तसेच 775 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. तसेच गुन्हे शाखा व विशेष शाखा यांची सहा फिरती पथके नियुक्त केली आहेत. शहरातील अंतर्गत भागात पथके गस्त घालणार आहेत. काही भागातील वाहतूक देखील वळविण्यात आली.

या प्रमुख चौकांत राहणार बंदोबस्त

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख 14 रस्त्यावर पोलिसांकडून चेकपोस्ट उभारण्यात येणार आहेत. त्यात सीएमई चौक, मोशी टोल नाका, भक्ती-शक्ती चौक, बोपखेल फाटा, तळेगाव चौक आणि एचपी चौक, मरकळ गाव, वाकगाव आणि डांगे चौक, चांदणी चौक, उर्से टोलनाका आणि सोमाटणे फाटा, टकले चौक या ठिकाणी वॉच राहणार आहे.

शहरातील पोलिस बंदोबस्त

उपायुक्त – 3
सहायक आयुक्त – 6
निरीक्षक – 33
सहायक/उपनिरीक्षक – 97
कर्मचारी – 635
राज्य राखीव दलाची तुकडी – 1
नियंत्रण कक्षाकडील राखीव तुकडी – 2

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news