Theur Chintamani Ganpati Temple: थेऊरच्या श्री चिंतामणी गणपती मंदिराचे दरवाजे पुन्हा खुले; संवर्धनाची कामे पूर्ण

महिनाभराच्या जतन-दुरुस्तीनंतर भाविकांसाठी दर्शन सुरू; महागणेश याग, मंत्रजागर आणि महाप्रसादाचे आयोजन
Theur Chintamani Ganpati
Theur Chintamani GanpatiPudhari
Published on
Updated on

लोणी काळभोर: अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपती मंदिराच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून, मंदिर बुधवार, दि. १० जून सकाळी १० वाजल्यापासून भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे.

Theur Chintamani Ganpati
Pune Shirur Gang War: पुणे-शिरूरमध्ये टोळीयुद्धाचा भडका; सरदवाडी घाट हत्येनंतर गुन्हेगारीवर पुन्हा चर्चा

महाराष्ट्र शासन आणि पुरातत्व विभागाच्या माध्यमातून मंदिराच्या संवर्धनासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीतून गाभारा, सभामंडप तसेच मंदिर परिसरातील विविध भागांची दुरुस्ती आणि सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत.

Theur Chintamani Ganpati
Shikrapur Illegal Liquor Action: शिक्रापूरमध्ये हातभट्टी दारूविरोधात कडक कारवाईचे आदेश; अधिकाऱ्यांना शिस्तभंगाचा इशारा

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त केशव विध्वंस यांनी ही माहिती दिली. दि. १० मे ते ९ जून या कालावधीत मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैशिष्ट्यांचे जतन करीत संवर्धनाची कामे पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Theur Chintamani Ganpati
Shikrapur Gambling Den Robbery: शिक्रापूर परिसरात जुगार अड्ड्यावर सशस्त्र चोरीचा प्रकार; लाखोंचे नुकसान चर्चेत

भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुविधायुक्त दर्शन मिळावे, यासाठी मंदिर परिसरातील विविध मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच, भाविकांना अधिक चांगला आध्यात्मिक अनुभव मिळावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले. मंदिर दर्शनासाठी खुले करण्यापूर्वी विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे.

Theur Chintamani Ganpati
Yavat Crime: यवत हादरवणारी घटना; सासरच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

मुख्य पुजारी आगलावे बंधू यांच्या माहितीनुसार श्री महागणेश याग, सहस्रावर्तन, मंत्रजागर तसेच महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. जतन-संवर्धनाची कामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे महिनाभराने मंदिराचे दरवाजे पुन्हा भाविकांसाठी खुले होत असल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news