Pune News| अतिक्रमण निरीक्षकांच्या होणार बदल्या

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर प्रशासन 'अॅक्शन मोड'वर
Pune News
Pune NewsFile Photo
Published on
Updated on

रस्त्यांच्या कडेला आणि पदपथांवरील अतिक्रमणे काढण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांनी शहरातील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना केल्यानंतर महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे.

Pune News
अयोध्येहून परतताना भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

अतिक्रमणांवर कारवाई होण्यासाठी आणि व्यावसायिकांशी असलेले लागेबांधे तुटण्यासाठी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्या अतिक्रमण निरीक्षकांच्या तत्काळ बदल्या करण्याचे आदेश दिल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.

राज्यमंत्री मोहोळ यांनी सोमवारी महापालिकेमध्ये शहरातील प्रकल्प आणि योजनांबाबतच आढावा घेतला. या वेळी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. एवढेच नव्हे, तर कारवाई रोखण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीचा फोन आला तरी त्याला प्रतिसाद देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी केल्या. या सूचनांची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे.

डॉ. भोसले म्हणाले, महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत हॉटेल्स, पब आणि अन्य आस्थापनांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. मागील काही दिवसांत साडेचार लाख चौरस फुटांहून अधिकचे बांधकाम आणि शेड्स पाडण्यात आले आहेत. यासोबतच अनधिकृत होर्डिंगवरील कारवाईदेखील सुरू असून, धोकादायक होर्डिंग उतरविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

Pune News
मगरीची धास्ती...पाण्याचा वाढता वेग..तरीही 48 तास शोधमोहीम

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मध्यंतरी मनुष्यबळाची कमतरता होती. मिळकत करातील चाळीस टक्के सवलत देण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याने तिकडेही कर्मचारी वर्ग केले आहेत. लवकरच हे कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागाकडे देण्यात येतील.

पहिल्या टप्प्यात सर्वसाधारण सभेने निश्चित केलेल्या नो हॉकर्स झोनमधील पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येतील. तसेच वर्दळीच्या रस्त्यांवरील व पदपथांवरील बेकायदा व्यावसायिकांनादेखील हटविण्यात येईल.

महापालिकेने परवाना दिलेल्या विक्रेत्यांचे पदपथ विक्रेते धोरणानुसार पुनर्वसन करण्यासाठी काम हाती घेण्यात येईल. महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या वॉर्ड ऑफिसर्सना त्यांच्या भागातील अतिक्रमणांवर कारवाई करून अहवाल आयुक्त कार्यालयाकडे देण्याचे आदेश दिले आहेत.

Pune News
डासांची उत्पत्ती 30 दशलक्ष वर्षांपूर्वीची

दरम्यान, बऱ्याच वेळा अनधिकृत व्यावसायिकांशी असलेल्या लागेबांध्यामुळे कारवाईकडे कानाडोळा केला जातो. अतिक्रमणांवर कठोर कारवाई होण्यासाठी आणि अतिक्रमण निरीक्षकांचे लागेबांधे तोडण्यासाठी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करत असलेल्या अतिक्रमण निरीक्षकांच्या तत्काळ बदल्या करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील सूचना अतिरिक्त आयुक्तांना केल्याचेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

नो हॉकर्स झोनमधील ४६ 66 रस्त्यांसह वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अनधिकृत व्यावसायिक हटविण्यासाठी अतिक्रमण विभागासह वॉर्ड ऑफिसर्सला आदेश देण्यात आले असून, त्यांना अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल.

-डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news