मगरीची धास्ती...पाण्याचा वाढता वेग..तरीही 48 तास शोधमोहीम

स्पेशल रेस्क्यु फोर्स, आयुष हेल्पलाईन टीमची मृतदेह शोधासाठी अडथळ्याची शर्यत
sangli News
स्पेशल रेस्क्यु टीमने कृष्णा नदीत मृतदेहाचा शोध घेतलाFile Photo

सांगली : कृष्णा नदीकाठी मगरीचा मुक्त वावर...त्यात पावसामुळे नदीतील वाढलेली पाण्याची पातळी...पाण्याचा वेगवान प्रवाह...अशा अडचणीवर मात करीत स्पेशल रेस्क्यु फोर्स, आयुष हेल्पलाईन टीमच्या सदस्यांनी जीव धोक्यात घालून तब्बल 48 तास तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबविली. अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी येथे मृतदेह मिळून आला. या पथकाला अजूनही शासकीय यंत्रणाकडून कोणतेच सहकार्य मिळत नाही. तरीही केवळ सामाजिक बांधलकीच्या नात्याने ते मदतीला धावून येत आहेत.

sangli News
Agriculture Day : शेतीच सांगली जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा

सांगलीच्या कृष्णा नदीवरील बंधार्‍यावरून रविवारी सेल्फीच्या नादात मोईन मोमीन (वय 24) या तरुणाचा पाय घसरून नदीपात्रात पडला. क्षणार्धात ता े वाहून गेला. त्याचा मैत्रिणीने मोईनच्या घरी घटनेची माहिती दिली. पोलिसांनाही तरुण वाहून गेल्याचे समजताच स्पेशल रेस्क्यु फोर्स, आयुष हेल्पलाईन टीमला बोलाविण्यात आले. सोबतीला महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान होते. त्यांनी एकत्रित शोध मोहीम हाती घेतली. रविवारी कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढत होती. पाण्याचा वेगही अधिक होता. तरीही जीवरक्षक पथकाने मोईनचा शोध घेण्यासाठी बोटीने पाण्यात उतरले. पहिल्या दिवशी हरिपूरपर्यंत शोधकार्य करण्यात आले. पाणी हलवून आजूबाजूला तो कोठे अडकला आहे का? याची चाचपणी केली. पण तो मिळून आला नाही.

स्पेशल रेस्क्युचे कैलास वडर, महेश गव्हाणे, अमिर नदाफ, शिवराज टाकळी, सचिन माळी, मोहसिन शेख, स्वप्नील धुमाळ, गणेश आवटी, योगश आवटी, आयुष हेल्पलाईन टीमचे सूरज शेख, अविनाश पवार, चितांमणी पवार, रुद्र कारंडे व त्यांच्या सहकार्‍यांनी केवळ सेवाभावीवृत्तीने या कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे.

sangli News
सांगली : ‘सरकारने मराठ्यांच्या सगेसोयरे आरक्षणाचा निर्णय घेऊ नये’

मगरीची धास्ती

कृष्णा नदीकाठी मगरीचा मुक्त वावर आहे. गेल्या काही वर्षांत मगरीने पोहण्यासाठी आलेल्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण कृष्णाकाठ मगरीच्या दहशतीखाली आहे. पथकाला सहा ठिकाणी मगरी दिसून आल्या. त्यामुळे पथकातील सदस्यांना नदीच्या पाण्यात उतरताना विचार करावा लागत होता. तरीही सदस्यांनी पाण्यात उतरून तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही मगरी तर बोटीच्या आवाजाने काठावरून पुन्हा पाण्यात येत होत्या. त्यामुळे मगरीकडून हल्ल्याची शक्यताही निर्माण झाली होती. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे अडथळे तरुणाच्या शोध मोहिमेवेळी पाण्याचा वेग अधिक होता. त्यामुळे पथकाला जीव मुठीत धरून शोधकार्य राबवावे लागले. वाहत्या पाण्यात थांबता येत नाही, अशी स्थिती तिथे पोहून मृतदेहाचा शोध घेतला. मोईन जिथे बुडाला होता, तिथे तर पाण्याचा प्रचंड वेग होता. तरीही पथकातील सदस्यांनी जीव धोक्यात घालून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. बोटीतून हरिपूर, म्हैसाळपर्यंत शोध मोहीम राबविली गेली. परत सांगलीकडे येताना पुन्हा अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती. पाण्याचा वेग अधिक असल्याने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येताना बोट हलत होती. तरीही केवळ सामाजिक बांधलकीच्या नात्याने ही पथके शासकीय यंत्रणाच्या मदतीला धावत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news