शंभर ते सव्वाशे महाविद्यालयांमध्ये यंदा प्रवेश नाही! ‘हे’ आहे कारण

शंभर ते सव्वाशे महाविद्यालयांमध्ये यंदा प्रवेश नाही! ‘हे’ आहे कारण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न 100 ते 125 महाविद्यालयांनी विद्यापीठ संलग्नता शुल्क भरलेले नाहीत. तसेच, या महाविद्यालयांमध्ये अनेक शैक्षणिक त्रुटी आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून या महाविद्यालयांना आता विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. परिणामी येत्या शैक्षणिक वर्षात तब्बल 100 ते 125 महाविद्याल यांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या 783 असून, त्यात पुणे जिल्ह्यात 453, अहमदनगर जिल्ह्यात 149, नाशिक व दादरा नगर हवेलीमधील 181 महाविद्यालयांचा समावेश आहे. केवळ मुलींच्या महाविद्यालयांची संख्या 24 असून, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटची संख्या 178 आहे. यामध्ये पुण्यात 129, अहमदनगरमध्ये 22 आणि नाशिकमध्ये 27 इन्स्टिट्यूटचा समावेश आहे. तसेच, एकूण रिसर्च इन्स्टिट्यूटची संख्या 73 असून, नाईट कॉलेजची संख्या 18 आहे. संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे 7 लाख 9 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.

स्वायत्त महाविद्यालयांकडून करणार वसुली…

विद्यापीठाशी संलग्न काही स्वायत्त महाविद्यालयांनी विद्यापीठाचे कोट्यवधी रुपयांचे शुल्क थकवले आहे. त्यामुळे या महाविद्यालया ंबाबत योग्य कार्यवाही करून थकवलेले शुल्क जमा करून घ्यावे, असा ठराव काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत करण्यात आला होता.

महाविद्यालये बंद करण्याची प्रक्रिया मोठी आणि किचकट आहे. ज्या महाविद्यालयांनी विद्यापीठाचे संलग्नीकरण शुल्क थकवले आहे किंवा ज्या महाविद्यालयांमध्ये काही शैक्षणिक त्रुटी, तसेच अनियमितता आहे अशा महाविद्यालायंची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. तसेच, त्यांना प्रवेशबंदी करण्यात येईल.

– डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news