नाट्यगृहाचे काम करणार दीड वर्षात पूर्ण : महापालिका आयुक्तांची ग्वाही 

नाट्यगृहाचे काम करणार दीड वर्षात पूर्ण : महापालिका आयुक्तांची ग्वाही 
धायरी : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे  छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह व कलामंदिराचे काम सुरू आहे. ते येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या कामाबाबत दै. 'पुढारी'ने सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यास यश मिळत आहे. या नाट्यगृहाचे काम निधीअभावी रखडले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव तापकीर व  आयुक्त विक्रम कुमार यांनी या प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली.
या वेळी सहायक आयुक्त संदीप खलाटे, माजी नगरसेवक श्रीकांत जगताप, हरिदास चरवड, सचिन मोरे, बाळासाहेब नवले, बाप्पूसाहेब पोकळे, किशोर पोकळे, सारंग नवले, सुशांत कुटे, माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे, ज्योती गोसावी, अनंत दांगट, सागर भूमकर, राजाभाऊ पासलकर, दत्तात्रय कोल्हे, रुपेश घुले आदी उपस्थित होते. परिसरातील नाट्य व कलाप्रेमींसाठी जानेवारी 2017मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत 19 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. या इमारतीत दोनमजली पार्किंग, आसन व्यवस्था, रंगमंच, मेकअप रूम, पडदा टाकण्याचा बीम, अंडरग्राऊंड पाण्याच्या टाक्या आदींची  कामे पूर्ण झाली आहेत.
आसन व्यवस्थेवरील छताचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु वरील दोन माजल्यांचे काम रखडले आहे. उर्वरित कला दालन, छतावरच्या टाक्या, अंतर्गत बांधकाम, प्लास्टर, प्लम्बिंग, साईड डेव्हलपमेंट, अंतर्गत इंटेरिअर, विद्युतीकरण, रंगकाम, नक्षीकाम इत्यादी अनेक कामे करणे बाकी आहेत.  या नाट्यगृहात साडेसातशे प्रेक्षकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था व भव्य कलादालन आणि आर्ट गॅलरी करण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरातील पहिलेच भारतीय शास्त्रीय संगीत महाविद्यालय येथे करण्यात येणार आहे.
या नाट्यगृहासाठी आवश्यक तेवढा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल. आगामी दीड वर्षांत
या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल.
-विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news