‘ते’ स्पा सेंटर पोलीस आयुक्तांच्या रडारवर!

दुर्लक्ष करणे ठाणे प्रभारींना भोवणार
police
‘ते’ स्पा सेंटर पोलीस आयुक्तांच्या रडारवर!file photo
Published on
Updated on

Pune News: शहरात बेकायदा ‘स्पा’ व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावतोय. मसाज सेंटरच्या नावाखाली ‘स्पा’मध्ये देहविक्रय होत असल्याच्या तक्रारी थेट पोलीस आयुक्तांपर्यंत पोहचल्या आहेत. तर, दुसरीकडे आर्थकि लागेबांधे असल्याकारणातून स्थानिक पोलिसांकडून याबाबत दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, एवढेच नाही तर सूचना दिल्यानंतर देखील जर एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध स्पा सेंटर सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास ठाणे प्रभारींची खैर नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अवैध व्यवसायाचे ‘स्पा’ सेंटर कोणाच्या मुळावर उठणार, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

police
Deepak Badgujar News : दीपक बडगुजर पोलिसांसमोर हजर होईना

मागील आठवड्यात शहरातील सर्व पोलीस ठाणे प्रभारींना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. ‘स्पा’ मध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या तक्रारी त्यांच्यापर्यंत आल्यानंतर, अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना देहविक्री सुरू असलेल्या स्पावर छापा टाकून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

पुढील एक तासात स्पाच्या नावे वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणावर स्थानिक पोलीस कारवाई करतील, अन्यथा आम्ही करू, असा दम पोलीस आयुक्तांनी ठाणे प्रभारींना भरला होता. त्यानंतर नुकतीच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोंढव्यातील आयरीन स्पा सेंटरवर कारवाई करून तीन तरुणींची सुटका केली आहे. त्यामुळे स्पा सेंटरमध्ये देहविक्रय होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

शहरात ’स्पा’ व्यवसायाचे अर्थकारण फार मोठे आहे. त्याची पाळेमुळे स्थानिक पोलीस ठाण्यापासून पोलीस आयुक्तालयाच्या भिंतीपर्यंत पोहचल्याचे बोलले जाते. ’स्पा’च्या आडून आयुर्वेदिक, थाई, मसाज सेंटरच्या नावाखाली राजरोसपणे वेश्याव्यवसायाची दुकाने थाटली जात असल्याचे वास्तव आहे. प्रामुख्याने थाई ’स्पा’ची सध्या चलती आहे. पर्यटन व्हिसावर आलेल्या विदेशी तरुणी येथे काम करताना दिसून येतात.

police
MPCS Paper: पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा!

पुण्यातील ’स्पा’ व्यवसाय साखळी पद्धतीने चालतो. काही व्यक्ती अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने हा व्यवसाय चालवत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत त्याचा मोठा गाजावाजा होताना निदर्शनास आलेला नाही. शिवाय स्थानिक पोलीस ठाण्याच्या ’वजनदार’ व्यक्तीपासून ते वरिष्ठांचे आर्थकि हितसंबंध या व्यवसायात जोपासले जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आम्हास काय कोणाची भीती, अशाच आविर्भावाचे वातावरण या व्यवसायात आहे.

पोलीस ठाण्याची ’वजनदार’ व्यक्ती खास मर्जीवान ’झिरो’ला हाताशी धरून हे रॅकेट चालवत असल्याचे समजते. ज्या स्पामध्ये वेश्याव्यवसायाला मूकसंमती दिली जाते, तेथे स्थानिक पोलिस ठाण्याच्या ’प्रभारी’बरोबरच ’वजनदार’ माणसाचा मोठा वाटा असल्याचे समजते. एकप्रकारे स्थानिक पोलीस ठाण्याची एनओसी मिळाली की राजरोसपणे ’स्पा’मध्ये देहविक्रयचा धंदा सुरू झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे ’स्पा’ सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाईल देहविक्रयच्या धंद्याची पाळेमुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार कशी खोदून काढणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news