MPCS Paper: पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा!

एमपीएससीच्या संयुक्त पूर्वपरीक्षेत विचारण्यात आला मद्यपानावर प्रश्न
MPCS Paper News
पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा!File Photo
Published on
Updated on

Pune News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. दोन सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेतील पेपर अवघड की सोपे यापेक्षा या परीक्षेत विचारण्यात आलेला दारू पिण्याविषयीच्या प्रश्नाचीच चर्चा स्पर्धा परीक्षार्थींमध्ये रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याविषयी समाज माध्यमांवरदेखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून आले.

MPCS Paper News
Chhagan Bhujbal |... तर आमच्याही शंभर जागा आल्या असत्या !

एमपीएससीने दोन्ही पेपरमध्ये विचारलेल्या विविध प्रश्नांपैकी एक प्रश्न दारू पिण्याविषयी विचारण्यात आला आहे. यामध्ये तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या दारू सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल, तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरासाठी (1) मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे. (2) दारू पिण्यास नकार देईन (3) फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन (4) नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेल की तुम्हाला यकृताचा आजार आहे असे विनोदी पर्याय देण्यात आले होते.

MPCS Paper News
निवडणूक आयोगाने माझ्यावर गुन्हा दाखल करावा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आव्हान

त्यामुळे या प्रश्नाचे नेमके काय उत्तर लिहायचे असा प्रश्न स्पर्धा परीक्षार्थींना पडल्याचे दिसून आले आहे. स्पर्धा परीक्षार्थींनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात प्रशासकीय सेवेत येऊन समाजाची सेवा करणे आणि जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करणार्‍या अधिकार्‍यांना दारूविषयी प्रश्न विचारणे आणि मित्रांना दारू प्यायला आवडते म्हणून तुम्हाला त्यांचा दारू पिण्याविषयी दबाव असू शकतो अशा प्रकारचे प्रश्न विचारून एमपीएससीला नेमके काय साध्य करायचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news