

भवानीनगर: श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनलला २१ पैकी १६ जागांवर उमेदवार मिळाले आहेत. श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन मे रोजी रात्री उशिरा श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनेल जाहीर करण्यात आला. या पॅनलला तीन गटांमध्ये पाच उमेदवार मिळालेले नाहीत.
त्यामुळे श्री जय भवानी माता पॅनलचे पाच उमेदवार आताच बिनविरोध विजयी झाले आहेत. श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनलमधून लासुर्ने गट क्रमांक एक मधून संजय सोमनाथ निंबाळकर व प्रताप मोहन पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सणसर गट क्रमांक दोनमधून संग्राम दत्तात्रय निंबाळकर व अभयसिंह विठ्ठलराव निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Latest Pune News)
उद्धट गट क्रमांक तीनमधून करणसिंह अविनाश घोलप व तानाजी साहेबराव थोरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अंथुर्णे गट क्रमांक चारमधून राजेंद्रकुमार बलभीम पाटील व बाबासो भगवान झगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोनगाव गट क्रमांक पाचमधून रवींद्र भीमराव टकले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुणवडी गट क्रमांक सहामधून नितीन अशोक काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनलला गट क्रमांक चारमध्ये एक उमेदवार कमी मिळाला असून गट क्रमांक पाचमध्ये दोन उमेदवार व गट क्रमांक सहा मधील दोन उमेदवार कमी मिळाले आहेत. ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पनन या मधून सत्यजित भाऊसाहेब सपकळ यांना उमेदवारी मिळाली आहे.
अनुसूचित जाती/जमातीमधून बाळासो उर्फ भाऊसो गुलाब कांबळे यांना उमेदवारी मिळाली आहे. महिला राखीवमधून सीता रामचंद्र जामदार व पद्मजा विराज भोसले यांना उमेदवारी मिळाली आहे. इतर मागास प्रवर्गातून संदीप वसंतराव बनकर यांना उमेदवारी मिळाली आहे. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातून तुकाराम गणपत काळे यांना उमेदवारी मिळाली आहे.
---------