

पुणे: उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने दक्षिण पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कात्रज परिसरातील कोणत्या भागात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद असणार आहे, याचे वेळापत्रक महापालिकेने जाहीर केले आहे.
वडगाव शुद्धीकरण केंद्रांतर्गत असणार्या धायरी, सनसिटी, वडगाव बुद्रुक, हिंगणे, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर, कात्रज, कोंढवा भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून महापालिकेने या भागात अघोषित पाणीकपात सुरू केली होती. त्यामुळे या भागात आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा अधिकृत निर्णय महापालिकेने घेतला आहे.
असे असेल पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक
सोमवार: बालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरुकृपा सोसायटी, निवारा सोसायटी, साईकृपा सोसायटी सर्व्हे क्रमांक 23, गुलमोहर सोसायटी, पवार हॉस्पिटल परिसर. कात्रज परिसर : उल्का सोसायटी परिसर, गुजरवस्ती, कात्रज तलावलगतचा भाग पूर्वेकडचा भाग, चौधरी गोठा. साहेबराव, गजानन महाराजनगर, शांतिनगर सोसायटी, महादेवनगर सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, सावंत कॉलनी.
मंगळवार: जुनी धायरी (संपूर्ण), उज्ज्वल टेरेस, दळवीवाडी, बारांगणीमळा, पारी कंपनी रस्ता भाग, सनसिटी संपूर्ण, माणिकबाग, महालक्ष्मी सोसायटी, मधुकर हॉस्पिटल परिसर, विठ्ठलवाडी, विठ्ठलनगर. कात्रज : राजस सोसायटी परिसर, निरंजन सोसायटी, कमला सिटी, स्टेट बँक सोसायटी, पोस्ट ऑफिस, नवीन पोस्ट ऑफिस, कामठे पाटीलनगर, खडीमशिन चौक, सिंहगड कॉलेज, हब टाऊन सोसायटी, कोलते पाटील सोसायटी प्रभाग - 37.
बुधवार: वडगाव बु., वडगाव हायवे, पेरूची बाग, धबाडी, जाधवनगर, वडगाव गावठाण, खोराडवस्ती, सुदत्त संकुल, समर्थनगर, संतोष हॉलमागील सोसायटी, आनंदनगर, हिंगणे, महादेवनगर, आंबेगाव, राजीव गांधी वसाहत, कात्रज-वाघजाईनगर, भांडे आळी, सुखदा-वरदा सोसायटी, सम्राट टॉवर, आंबामाता मंदिराचा मागील परिसर, शिवशंभोनगर गल्ली 1, माऊलीनगर, सिल्व्हर ओक सोसायटी, बलकवडेनगर. सुखसागरनगर भाग 2, शिवशंभोनगर (कात्रज कोंढवा रस्ता) शिवसमर्थनगर.
गुरुवार: धनकवडी मंडळ नं. 23, धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, चित्तविहार सोसायटी, अक्षयनगर, दौलतनगर, कलानगर, गुलबननगर, चैतन्यनगर, ब क्रमाक 34, 35, 36, 37 सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर, तळजाई पठार सर्व्हे क्रमांक 4, 5, 7, 8, गणेशदत्त सोसायटी, टिळकनगर, सावरकर सोसायटी, आंबेडकर वसाहत, ग्रीन पार्क, आविष्कार सोसायटी, सन्मित्र सोसायटी, सागर सोसायटी, सहकारनगर भाग 1, दाते बसस्टॉप. सुखसागरनगर भाग-1, मॅजेस्टिक टॉवर, रोहितदास महाराज मठ, शिवशंभोनगर, स्वामी समर्थनगर (डोंगर भाग), नीलया सोसायटी, महादेवनगर भाग-2. कोंढवा : सावकाशनगर, काकडेवस्ती, शिवशंभोनगर (काकडेवस्ती भाग), गोपाळनगर (रस्त्याचा व डोंगर भाग), वृंदावननगर.
शुक्रवार: आंबेगाव पठार : आंबेगाव पठार सर्व्हे क्रमांक 15 ते 30, महाराणा प्रताप चौक, सर्व्हे क्रमांक 17 ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, त्रिमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठामागील संपूर्ण परिसर, कात्रज - वसवडेनरर, पोलिस कॉलनी, जाधवनगर, जोगेश्वरीनगर, मोरे-निंबाळकरवस्ती, भारतनगर, दत्तनगर. कोंढवा बु. (गावठाण), वटेश्वर मंदिर, हिल व्ह्यू सोसायटी, मरळनगर, कांतिन अपार्टमेंट्स, विष्णू ठोसरनगर, कोंढवा बु. (माळ कामटे गल्ली), कपिलनगर, लक्ष्मीनगर संपूर्ण.आगम मंदिर, संतोषनगर, अंजलीनगर, दत्तनगर, जांभूळवाडी रस्ता, वंडर सिटी परिसर, साईनगर.
शनिवार: कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, अखिल नवीन वसाहत कात्रज. राजीव गांधी वसाहत (संपूर्ण), चैत्रबन वसाहत, कृष्णानगर, झांबरेकर वसाहत, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, काकडेवस्ती गल्ली क्र. 1, शिवशक्तीनगर, अशरफनगर गल्ली क्र. 7, 8 व 9.
रविवार: महादेवनगर भाग-1, आनंदनगर, विद्यानगर, महावीरनगर. शिवप्लाझा, पिसोळी रस्ता, एचडीएम सोसायटी, पारगोनगर, 15 नंबर, आंबेडकरनगर (संपूर्ण), पुण्यधाम आश्रम रस्ता, हगवणेनगर, अशरफनगर.