पुणे : एकीकडे शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट होत चालला आहे. अर्धवट झालेली पावसाळी कामे, मेट्रोची कामे, रस्त्यावरील छोटे-मोठे खड्डे यांमुळे वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत ठेवून वाहन चालवावे लागत आहे.
वाहतूक कोंडी सत्यावर अन् भीती नागरिकांच्या मनात, अशीच काहीशी परिस्थिती शहरातील वाहतूक कोंडीमुळे निर्माण झाली आहे. इच्छितस्थळी पोहोचण्याचा कालावधीही वाहतूक कोंडीमुळे वाढला आहे. त्याच धर्तीवर पुढारी टीमने हडपसर रविदर्शन चौक, मगरपट्टा, मुंढवा आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा घेतलेला आढावा.
पुणेरी मेट्रोच्या वतीने येथील चौकात मेट्रो मार्गिका आणि उप्नणपुलाचे काम सुरू आहे, हे काम आगामी वर्षअखेरपर्यंत सुरू असेल. या कामामुळे चौक आणि परिसरात होणारया कोंडीमुळे या परिसरात राहणाऱ्या वाहनचालकांच्या चांगल्याच नाकी नऊ येत आहे.
कोंडी सोडवण्यासाठी येथे वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या चौकात येणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. जोपर्यंत येथील मेट्रो मार्गिका आणि उष्णपुल उष्णपुलाचे काम होत नाही, तोपर्यंत येथील वाहतूक कोंडी सुटणार नाही.
मेट्रो प्रशासनाने लवकरात लवकर येथील काम संपवावे आणि रस्ता मोकळा करणे आवश्यक आहे. तसेच, पीएमपी बसच्या वेगावर या चौकात नियंत्रण असावे, अशी मागणीही केली जात आहे. विद्यापीठ चौकात रस्ता ओलांडणे होतेय मुश्कील मेट्रोच्या कामामुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे.
या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी वाहनचालक बेशिस्तपणे भरधाव आपली वाहने रस्ता मिळेल तिथून चालवत आहेत. परिणामी, अशा भरधाव वाहनांमुळे येथून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे मुश्कील होत आहे. परिणामी, येथील चौकात रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता आहे.
बेशिस्त वाहनचालकांना लगाम लावा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मेट्रोच्या कामामुळे झालेल्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी वाहनचालक जेथून रस्ता मिळेल, तेथून वाहने पळवत आहेत, नो एन्ट्रीतदेखील वाहने नेली जात आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे पोलिसांसमोरच काही दुचाकीस्वार नो एन्ट्रीतून वाहने चालवत आहेत. अशा बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालणे आवश्यक आहे, अन्यथा, येथे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे
पुणे विद्यापीठ चौकात कोंडीतून भरधावपणे धावणाऱ्या वाहनांमुळे आमच्यासारख्या पादचाऱ्यांना येथून रस्ता ओलांडणे, मुश्कील झाले आहे. येथून रस्ता ओलांडताना आम्हाला भीती वाटते. तसेच, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचा, विद्यार्थ्यांचा रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.
आनंद पाठक, पादचारी
विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे मुंढवा उड्डाण पुलावर नित्याचीच वाहतूककोंडी होत आहे. या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे खराडी, मुंढवा, केशवनगर या भागाकडून हडपसर, मगरपट्टा, साडेसतरा नळी, अॅमनोरा या भागासह सोलापूर, सासवड भागाकडे जाणाऱ्या वाहनांची चांगलीच कोंडी होऊ लागली आहे.
या कोंडीमुळे वाहनचालकांना वाहने पुढे नेणे अतिशय अवघड होते. त्यातच सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी या बाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांसमोर मुंढवा उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी मोठी समस्या बनली आहे.
मुंढवा उड्नुणपुलावर नित्याचीच वाहतूक कोंडी असते. त्यातच आता मागील काही महिन्यांपासून साडेसतरा नळी रोड, अॅमनोरा आणि आसपासच्या भागातून खराडीकडे जाण्यासाठी नागरिक उलट्या दिशेने येताना दिसतात, त्यातही दुचाकी वाहनांची संख्या जात असते. मुंढवा चौकात होणाऱ्या कॉडीमुळे वाहतूक पोलिस हैराण झाले आहेत. त्यामुळे उलट दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे अवघड झाले आहे.
खराडीकडून सोलापूरच्या दिशेला जाण्यासाठी वाहनचालकांना या उड्नुणपुलावर न जाता उड्नुणपुलाच्या बाजूने सोलापूरच्या दिशेला जावे लागते. त्याच वेळी स्वारगेटच्या दिशेने येणारी वाहने याच उड्नुष्णपुलाखालून जातात, तर सोलापूरकडून स्वारगेटकडे जाताना वाहनचालक पुलावर न जाता पुलाच्या बाजूने वाहने नेतात. त्याबरोबरच सोलापूर रोडवरून खराडीच्या दिशेला जाण्यासाठी बहुतांश वाहनचालक ब्रिजवर न जाता ब्रिजच्या बाजूनेच जाणे पसंत करतात.
हडपसर गाडीतळावरून सोलापूरच्या दिशेने जाताना रविदर्शन चौक आणि पंधरा नंबर चौकात नेहमीच वाहतूक कोंडी झाल्याचे पाहयला मिळते. अनेकवेळा रविदर्शन चौकात पोलिस वाहतूक नियंत्रण करताना दिसतात. मात्र, पंधरा नंबर चौकात पोलिस वाहतूक नियमन सोडून वाहनचालकांकडून दंड वसुलीची प्रक्रिया जोरदार करताना दिसतात
या दोन्ही चौकांत सकाळी ८ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेस वाहतूक कोंडी जास्त होते. दुसऱ्या बाजूला उदगीर, बीड, सोलापूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सकडूनही नियमांचे वारंवार उल्लंघन होत आहे. पोलिसांच्या आदेशाला खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी केराची टोपली दाखविली आहे.
रविदर्शन चौकाजवळ झालेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम पुढील वाहतुकीवरदेखील होतो. मांजरी फाटा, शेवाळवाडी फाटा या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात होते. तेथील वाहतूक कोंडीचा ताण रविदर्शन चौकातही दिसून येतो. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावर तासन् तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पाऊस पडल्यानंतर वाहतूक पोलिसांनादेखील कोंडी सोडविणे अवघड होते. पालिका आणि पोलिस प्रशासन यांनी एकत्र काम करणे गरजेचे असल्याचे नागर