पुणे : भाविकांच्या गर्दीने फुलली मंदिरे

पुणे : भाविकांच्या गर्दीने फुलली मंदिरे
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हिरवी साडी… हाती खणा-नारळाची ओटी… त्यात फुलांच्या माळा… आणि सोबतीला कुटुंबीयांसह चिमुकल्यांना घेऊन शहरातील देवींच्या प्रसिध्द मंदिरांमध्ये महिलांसह भाविकांनी शुक्रवारी (दि. 20) दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरवर्षी नवरात्रीनिमित्त पुणेकर आपल्या कुटुंबीयांसह शहरातील प्रसिध्द देवींच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी येत असतात. यंदाही तितक्याच उत्साहात आणि भक्तिभावाने पुणेकरांनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरात रांगा लागल्या आहेत. मंगलमय वातावरणात भाविक मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेत आहेत.

शहरातील सेनापती बापट रस्त्यावरील चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील तुळजा भवानी मंदिर, सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिर, वारज्यातील वनदेवी मंदिर, अप्पा बळवंत चौकातील तांबडी जोगेश्वरी मंदिर, तळजाई टेकडीवरील तळजाईमाता मंदिर, कात्रज परिसरातील सच्चाईमाता मंदिर, अप्पर-इंदिरानगर भागातील अंबामाता मंदिर यांसह अनेक मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

भाविकांचा सुरक्षा विमा

याबाबत चतु:शृंगी मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त नरेंद्र अनगळ म्हणाले, देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येणार्‍या भाविकांची संख्या वाढत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी ट्रस्टच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, भाविकांचा सुरक्षा विमा काढण्यात आला आहे. तसेच, परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी तसेच सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाची मोठी मदत मिळाली आहे. त्यामुळे येथे कडक बंदोबस्त आहे. यासह आमचे स्वयंसेवकसुध्दा भाविकांसाठी सज्ज आहेत. यासह 24 तास सीसीटीव्हीच्या माध्यमातून परिसरावर लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news