Ambabai Temple : अंबाबाई मंदिराचे स्थापत्य म्हणजे शिल्पवैभवाचे अप्रतिम सौंदर्य | पुढारी

Ambabai Temple : अंबाबाई मंदिराचे स्थापत्य म्हणजे शिल्पवैभवाचे अप्रतिम सौंदर्य

श्री महालक्ष्मी मंदिराला वैभवशाली इतिहास आहे. (Ambabai Temple ) या मंदिराचे स्थापत्य आणि शिल्पवैभव हे तत्कालीन राजवटींनी निर्मिलेल्या अलौकिक कलेचा उत्तुंग आविष्कार आहे. हजाराहून अधिक वर्षे होऊनही हे स्थापत्य आणि शिल्पवैभव सौंदर्याचा आरसपानी दाखला बनला आहे. या ऐतिहासिक, समृद्ध स्थापत्य आणि शिल्पाची ओळख आहे. (Ambabai Temple)

प्राचीन स्थापत्याच्या दृष्टीने करवीरनगरीचा सुवर्णकाळ म्हणजे नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतचा काळ. या कालखंडात करवीरच्या भूमीत अनेक भव्य मंदिरांची निर्मिती झाली. राजपरिवाराच्या निवासांची निर्मितीसुद्धा याच काळात झाली असावी. तथापि, निवासाच्या इमारतीचे अवशेष सध्या दिसत नाहीत; पण त्या कालखंडातील मंदिरांची मांदियाळी करवीरनगरीच्या शिल्पवैभवाची शान अद्याप टिकवून आहे. या तीनशे वर्षांच्या कालखंडातील कोल्हापूरचे शिल्पवैभव म्हणजे श्री महालक्ष्मी मंदिर, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, मंगळवार पेठेतील ओंकारेश्वराचा मंदिर प्रकार, गंगावेसजवळचे रूपनारायण जैन मंदिर, अशी अनेक मंदिरे आज सुस्थितीत आहेत. हजार ते बाराशे वर्षांच्या काळाचे आघात सोसून विविध राजवटीमधील विविध सांप्रदायिक परंपरा पचवत कोल्हापूरचे हे शिल्पवैभव दिमाखाने उभे आहे.

प्राचीन स्थापत्याच्या दृष्टीने करवीरनगरीचा सुवर्णकाळ म्हणजे नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतचा काळ. या कालखंडात करवीरच्या भूमीत अनेक भव्य मंदिरांची निर्मिती झाली. राजपरिवाराच्या निवासांची निर्मितीसुद्धा याच काळात झाली असावी. तथापि, निवासाच्या इमारतीचे अवशेष सध्या दिसत नाहीत; पण त्या कालखंडातील मंदिरांची मांदियाळी करवीरनगरीच्या शिल्पवैभवाची शान अद्याप टिकवून आहे. या तीनशे वर्षांच्या कालखंडातील कोल्हापूरचे शिल्पवैभव म्हणजे श्री महालक्ष्मी मंदिर, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, मंगळवार पेठेतील ओंकारेश्वराचा मंदिर प्रकार, गंगावेसजवळचे रूपनारायण जैन मंदिर, अशी अनेक मंदिरे आज सुस्थितीत आहेत. हजार ते बाराशे वर्षांच्या काळाचे आघात सोसून विविध राजवटीमधील विविध सांप्रदायिक परंपरा पचवत कोल्हापूरचे हे शिल्पवैभव दिमाखाने उभे असणारे त्रिकुटात्मक मंदिर आहे. तीनही गाभार्‍यांना छत असलेला (बंदिस्त) स्वतंत्र प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिररचना
शास्त्रात अशा मंदिरांना ‘सांधार’ या नावाने ओळखले जाते. बारकाईने मंदिराचे निरीक्षण केले तर वेगवेगळ्या शैलीतली तीन स्वतंत्र मंदिरे अत्यंत कौशल्यपूर्वक एकमेकांना जोडून भव्य असे त्रिगुणात्मक देवतेचे त्रिकूट मंदिर निर्माण केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या तीन स्वतंत्र मंदिरांपैकी महाकालीचे मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या तुलनेत प्राचीन वाटते. (Ambabai Temple)

मंदिराच्या मंडोवरावरील म्हणजे बाह्य भिंतीवरील देवकोष्ठांची  उंची, आकार व रचना यात खूपच तफावत दिसते. तसेच महाकाली मंदिराच्या गाभार्‍याचा प्रदक्षिणा मार्ग हवा खेळती ठेवण्यासाठी झरोके ठेवून बांधलेला दिसतो. शिवाय महाकाली मंदिराच्या गर्भगृहाच्या चौकटीवर सामान्यत: जिथे गणेश असतो त्या ठिकाणी कालीचेच शिल्प असलेली शिळा बसवली आहे. मंदिराच्या जगतीवरील आधारशिला या त्रिकोणी शिखरासारख्या आहेत. संभवत: दक्षिणाभिमुख कालीच्या या मंदिराची रचना उत्तराभिमुख दरवाजा असणारी असावी. महाकालीच्या या मंदिराच्या पूर्व बाजूस नुकतेच 2013 साली फरशी बदलण्याचे काम सुरू असताना एक रंगशिळा फुटलेल्या अवस्थेत सापडली. तीनही गाभार्‍यांना छत असलेला (बंदिस्त) स्वतंत्र प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिररचना शास्त्रात अशा मंदिरांना ‘सांधार’ या नावाने ओळखले जाते.

बारकाईने मंदिराचे निरीक्षण केले तर वेगवेगळ्या शैलीतली तीन स्वतंत्र मंदिरे अत्यंत कौशल्यपूर्वक एकमेकांना जोडून भव्य असे त्रिगुणात्मक देवतेचे त्रिकूट मंदिर निर्माण केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या तीन स्वतंत्र मंदिरांपैकी महाकालीचे मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या तुलनेत प्राचीन वाटते. मंदिराच्या मंडोवरावरील म्हणजे बाह्य भिंतीवरील देवकोष्ठांची उंची, आकार व रचना यात खूपच तफावत दिसते. तसेच महाकाली मंदिराच्या गाभार्‍याचा प्रदक्षिणा मार्ग हवा खेळती ठेवण्यासाठी झरोके ठेवून बांधलेला दिसतो. शिवाय महाकाली मंदिराच्या गर्भगृहाच्या चौकटीवर सामान्यत: जिथे गणेश असतो त्या ठिकाणी कालीचेच शिल्प असलेली शिळा बसवली आहे. मंदिराच्या जगतीवरील आधारशिला या त्रिकोणी शिखरासारख्या आहेत. संभवत: दक्षिणाभिमुख कालीच्या या मंदिराची रचना उत्तराभिमुख दरवाजा असणारी सावी. महाकालीच्या या मंदिराच्या पूर्व बाजूस नुकतेच 2013 साली फरशी बदलण्याचे काम सुरू असताना एक रंगशिळा फुटलेल्या अवस्थेत सापडली. यावरूनसुद्धा  मंदिराचे स्वतंत्र अस्तित्व एकेकाळी असावे, हेच सिद्ध होते. (Ambabai Temple)

या मंदिराचा स्वतंत्रपणे विचार करून निरीक्षण केले असता आच्छादित प्रदक्षिणा मार्ग असलेला गाभारा सुमारे तीन ते साडेतीन फुटांचे अंतराळ आणि बारा खांबावर उभा असलेला स्वतंत्र मंडप अशी याची रचना दिसते. मंडपाला पूर्व आणि पश्चिम दिशेने प्रवेशद्वारे आहेत. उत्तरेकडील प्रवेशमार्ग मंदिराच्या एकत्रीकरणाच्या वेळी एका चिंचोळ्या मार्गिकेने मुख्य मंदिराच्या घंटाचौकास कौशल्याने जोडण्यात आला आहे. पूर्वेकडील जोडस्थानावर श्रीयंत्र बसवले आहे, तर पश्चिमेकडील बाजूवर सुमारे तीन फूट उंचीच्या चबुतर्‍यावर गणेशाची मूर्ती आहे. हाच गणेश पूर्वी महालक्ष्मीच्या समोर होता. तो जीर्ण झाल्यामुळे नवीन गणेशमूर्ती घडवून स्थापिली गेली व जुनी मूर्ती इथे बसवली, असे मंदिरातील जुने जाणकार सांगतात. यानंतरच्या उत्तर दिशेच्या मार्गिकेमध्ये पूर्वेकडे सप्ताश्वरथावर आरूढ सूर्य आणि पश्चिमेकडे वरुण अशा जुन्या मूर्ती अर्धभिंतीवर ठेवण्यात आल्या आहेत. हे स्थान म्हणजे मूळ महाकाली मंदिराचे मुख्य उत्तराभिमुख प्रवेशस्थान असावे.

महाकालीच्या मंदिराच्या बाह्य अंगावरील देवकोष्ठातील शिल्पे ही ‘सुरसुंदरी’ प्रकारात मोडणारी आहेत. उदा. पत्रलेखिका, मृदुंग वाजवणारी स्त्री. तर महालक्ष्मी मंदिराच्या मंडोवरावरील 64 शिल्पे ही योगिनींची आहेत. 1942 च्या सुमारास रूक्मिणी स्वयंवर नावाच्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी या दोन्ही मंदिरांच्या रथिकांमधील शिल्पांची चुना व गुळाच्या पारंपरिक मिश्रणाने दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावेळी कलाकाराच्या कल्पनेनुसार या शिल्पांपैकी काहींचे स्वरूप बदलले गेले.

महालक्ष्मीचे मंदिर हे दुमजली असून त्याचा गाभारा व त्यावरील दुसरा मजला या दोन्हींना प्रदक्षिणा मार्ग आहे. गाभार्‍याप्रमाणेच दुसर्‍या मजल्यावरसुद्धा पूर्व, उत्तर व दक्षिण दिशांना मोकळ्या खोल्या असून त्यांना बाहेरच्या बाजूस दरवाजेही आहेत. सध्या या दरवाजांमध्ये स्पीकर्स बसविण्यात आले आहेत. या द्वारांच्या बरोबर 1942 च्या सुमारास रूक्मिणी स्वयंवर नावाच्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी या दोन्ही मंदिरांच्या रथिकांमधील शिल्पांची चुना व गुळाच्या पारंपरिक मिश्रणाने दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावेळी कलाकाराच्या कल्पनेनुसार या शिल्पांपैकी काहींचे स्वरूप बदलले गेले.

महालक्ष्मीचे मंदिर हे दुमजली असून त्याचा गाभारा व त्यावरील दुसरा मजला या दोन्हींना प्रदक्षिणा मार्ग आहे. गाभार्‍याप्रमाणेच दुसर्‍या मजल्यावरसुद्धा पूर्व, उत्तर व दक्षिण दिशांना मोकळ्या खोल्या असून त्यांना बाहेरच्या बाजूस दरवाजेही आहेत. सध्या या दरवाजांमध्ये स्पीकर्स बसविण्यात आले आहेत. या द्वारांच्या बरोबर मंदिराबाहेर जाते व पुन्हा याच मार्गाने मंदिरात येते. 17 व्या शतकातील रचना असल्याचा उल्लेख कोरलेल्या पूर्व दरवाजा आणि त्याहीनंतरचा दक्षिण दरवाजा अशा चार दिशांच्या चार द्वारांनी बंदिस्त महालक्ष्मी मंदिर प्रकारात सूर्याच्या चार, तर गणेशाच्या सुमारे दहा मूर्ती आहेत. दक्षिण दिशेने गणेश मंडपात प्रवेश करताना दाराच्या दोन्ही बाजूस चंद्र -सूर्याची शिल्पे आहेत, तर सरस्वती मंदिराकडे जाणार्‍या पश्चिमाभिमुख द्वाराजवळील वराहशिल्पाच्या मुखावर लक्ष्मीची वेगळीच मूर्ती बसवून त्या शिल्पाला वराहलक्ष्मीचे रूप देण्यात आले आहे. हे मंदिर एका रात्रीत बांधले, अशी आख्यायिका आहे. लेखाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे नवव्या शतकापूर्वीपासून महालक्ष्मीचे स्थान इथे होते; पण नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतच्या कालखंडात मंदिराच्या स्थापत्याचा विकास झाला. देवीच्या भक्तांची संख्या खूपच वाढली. पूर्वी फारसे ज्ञात नसणारे क्षेत्र तीर्थधाम म्हणून प्रसिद्धीस आले. देवीच्या कृपेने 300 वर्षांची अंधकारमयी रात्र संपून नगरीच्या भाग्याचा सूर्योदय मंदिराच्या पूर्ततेनंतर झाला. अशा अर्थाने हे रूपक वापरण्यात आले.

Back to top button