महिला अधिकार्‍यास अश्रू अनावर! येरवड्यातील प्रकार

महिला अधिकार्‍यास अश्रू अनावर! येरवड्यातील प्रकार
Published on
Updated on

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीत माहिती अधिकार कार्यकर्ते विकासकामांवरून वारंवार त्रास देत असल्याचे सांगताना महिला कनिष्ठ अभियंत्यास रडू कोसळले. पोलिसापर्यंत हे प्रकरण जाणार होते. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांनी मध्यस्थी करून ते प्रकरण मिटविले आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटीची बैठक बुधवारी पार पडली. या वेळी माहिती अधिकार कार्यकर्ते एजाज खान यांनी कनिष्ठ अभियंता अस्मिता कुटे यांना उद्देशून 'उर्दू शाळेजवळ ड्रेनेज लाईनचे काम का केले नाही? तो निधी कुठे वापरला,' याबाबत सहायक अभियंता इंद्रायणी करचे यांना माहिती विचारली.

कुटे म्हणाल्या, 'माझी या प्रभागातून दुसर्‍या प्रभागात बदली झाली आहे. हे काम करून देऊ, असे सांगितले होते. मात्र, सांडपाणी नागरिकांच्या घरात जात असल्याची तक्रार माजी नगरसेवकांनी केल्याने ते काम तातडीने करणे आवश्यक होते. त्यामुळे ड्रेनेजचे काम बाकी राहिले. त्यानंतर माझी या प्रभागातून बदली झाल्याने माझ्या जागी आलेल्या कनिष्ठ अभियंत्यांना काम करून देण्यास सांगितल्यानंतर त्यांनी हे काम करून दिले आहे.

तरीदेखील खान यांच्यासह इतर माहिती अधिकार कार्यकर्ते मला मानसिक त्रास त्रास देत आहेत.' उपभियंता तुळशीराम नागटिळक म्हणाले, खान यांनी सांगितलेले काम पूर्ण झाले आहे. एवढेच की, कुटे यांची बदली झाल्याने ते दुसर्‍या अधिकार्‍याने केले आहे. काम करूनदेखील वारंवार हा विषय चर्चेत येत असल्याने कुटे यांना अश्रू अनावर झाले.

मी शाळेतील विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितलेले काम कनिष्ठ अभियंता कुटे यांनी केले नाही. दुसर्‍या कनिष्ठ अभियंत्यांनी ते केले आहे. मग या कामासाठी उपलब्ध झालेला निधी कुठे खर्च झाला, याची बैठकीत सहायक महापालिका आयुक्तांना माहिती विचारली. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांना बगल देऊन सहानभूती मिळविण्यासाठी कुटे यांनी अश्रू ढाळल्याचा आरोप खान यांनी केला.

– एजाज खान, माहिती अधिकार कार्यकर्ता

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news