

पुणे : भारतातील अग्रगण्य व्यावसायिक वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने 17 नवीन ‘नेक्स्ट-जनरेशन’ ट्रक्सचा पोर्टफोलिओ लाँच केला आहे. 7 ते 55 टन वजनी श्रेणीतील या वाहनांद्वारे सुरक्षितता आणि नफा वाढवण्याचे नवीन मानक प्रस्थापित करण्यात आले असून, ट्रकच्या क्षेत्रात यामुळे मोठे परिवर्तन घडून येईल, असा दावा कंपनीने केला आहे.
या लाँचमध्ये प्रामुख्याने ‘ऑल-न्यू अझुरा सीरिज’, प्रगत इलेक्ट्रिक ट्रक्स (एत) आणि प्रस्थापित प्राईमा, सिग्ना व अल्ट्रा प्लॅटफॉर्ममधील अपग््रेाडस्चा समावेश आहे. जागतिक सुरक्षा मानकांचे (एउए ठ29 03) पालन करणारे हे ट्रक्स मालकी हक्क खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यास मदत करतील.
टाटा मोटर्सचे एमडी गिरीश वाघ म्हणाले की, ‘वाढत्या पायाभूत सुविधा आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्सच्या मागणीनुसार आम्ही हा पोर्टफोलिओ सादर केला आहे. यात उच्च कार्यक्षम पॉवरट्रेन्स आणि ‘फ्लीट एज’ डिजिटल सेवांचे एकत्रीकरण आहे.’ शाश्वत गतिशीलतेच्या दिशेने आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या स्वप्नपूर्तीसाठी टाटा मोटर्सने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सुरक्षित केबिन आणि इंधन कार्यक्षमता यामुळे हे ट्रक्स वाहतूकदारांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.