Shirur News: गणेशोत्सवाच्या पंगतीला गेले अन् इकडे चोरांनी घर फोडले; शिरुर तालुक्यातील घटना

Takali Haji House Theft: टाकळी हाजीतील वरखडेवस्तीवर चोरी; गणेशोत्सव काळात घराच्या सुरक्षेबाबत पोलिसांचे आवाहन
theft
theftPudhari
Published on
Updated on

टाकळी हाजी: गणेशोत्सवानिमित्त आयोजित अन्नदानाच्या पंगतीसाठी घरातील सर्व सदस्य बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा उघडून रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील वरखडेवस्तीवर शुक्रवारी (दि. १९) रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आला. धार्मिक उत्सवकाळातही घराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास चोरट्यांना संधी मिळू शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

theft
Engineering Career Opportunities: अभियांत्रिकी क्षेत्रात संधींचे नवे विश्व; एआय, रोबोटिक्स, ई-वाहनांसह नव्या तंत्रज्ञानाला मोठी मागणी

वरखडेवस्तीवरील नागरिकांनी एकत्रितपणे गणपतीची स्थापना केली असून, दररोज एका कुटुंबाकडून अन्नदानाची पंगत आयोजित केली जाते. शुक्रवारी गेणभाऊ वरखडे यांच्या कुटुंबाची पंगत असल्याने घरातील सर्व सदस्य घराला कुलूप लावून गणपतीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला.

theft
Pune Anant Chaturdashi Rain: अनंत चतुर्दशीला पुण्यात जोरदार पावसाची शक्यता; विसर्जन मिरवणुकीवर जलाभिषेकाची शक्यता

गणपतीची आरती व प्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर कुटुंबातील एक महिला घरी परतली असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे तिच्या निदर्शनास आले. घरातील दरवाजे उघडे असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने शेजारी व कुटुंबातील सदस्यांना तत्काळ माहिती दिली. घरातील कपाटाची पाहणी केली असता त्यातील रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार सतीश मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

theft
Belbag Chowk Traffic: गणेशभक्तांना पूर्व भागात जाण्यास बंदी नाही; बेलबाग चौकातील वाहतूक नियोजनावरून मंडळांचा आक्षेप

उत्सव साजरा करताना आनंदाबरोबर जागरूकता हीदेखील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे. नागरिकांनी घर काही काळासाठी बंद ठेवून बाहेर जाताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

गोविंद खटिंग, पोलिस उपनिरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news